एक्स्प्लोर
MI Squad : जोफ्रा 'आऊट' जॉर्डन 'इन'; आर्चरच्या जागी मुंबईच्या पलटनमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज दाखल
Chris Jordan Replaces Jofra Archer : जोफ्रा आर्चरच्या जागी इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस जॉर्डन मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघात सामील झाला आहे.

Jofra Archer ruled out of IPL Chris Jordan replaces Jofra
1/8

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज चोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर गेला आहे. यामुळे मुंबईच्या अडचणीत वाढ झाली आहे.
2/8

जोफ्रा आर्चरच्या जागी मुंबईच्या संघात इंग्लंडचा दुसरा वेगवान गोलंदाज सामील झाला आहे.
3/8

जोफ्रा आर्चरच्या जागी इंग्लंडचा वेगवान-मध्यम गोलंदाज ख्रिस जॉर्डन याला मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला आहे.
4/8

मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे.
5/8

मुंबई इंडियन्सने ट्वीट करत म्हटलं आहे, ''ख्रिस जॉर्डन मुंबईच्या संघात सामील. ख्रिस जॉर्डन उर्वरित हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या संघात सामील होईल. ख्रिसने जोफ्रा आर्चरची जागा घेतली आहे.'''
6/8

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, ''जोफ्रा आर्चर सध्या दुखापतग्रस्त असून त्यांच्या रिकव्हरी आणि फिटनेसचं निरीक्षण केलं जात आहे. जोफ्रा उपचारांसाठी मायदेशी परतणार आहे.''
7/8

मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज आयपीएलच्या सुरुवातीपासूनच अडचणीत होता. तो संपूर्ण टूर्नामेंटमध्ये फिटनेसच्या समस्यांमुळे त्रस्त होता.
8/8

यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्सच्या दहापैकी पाच सामन्यांनाही तो मुकला होता. आर्चरच्या जागी आणखी एक इंग्लंडचा स्टार गोलंदाड ख्रिस जॉर्डनची निवड करण्यात आली आहे. जॉर्डन मुंबईच्या ताफ्यात सामील झाला आहे.
Published at : 09 May 2023 02:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
