एक्स्प्लोर
Rabada IPL Record : 64 सामने, 100 विकेट... आयपीएलमध्ये रबाडाची दमदार कामगिरी! लसिथ मलिंगाला टाकलं मागे
Kagiso Rabada in IPL : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) सर्वात कमी डावात 100 विकेट्स घेण्याचा विक्रम कगिसो रबाडाच्या नावावर झाला आहे.
Rabada IPL Record | IPL 2023
1/10

Kagiso Rabada fastest To Take 100 Wickets In IPL : आयपीएल 2023 मधील 18 व्या सामन्यात, पंजाब किंग्स (PBKS) संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याने नवा विक्रम रचला आहे.
2/10

गुजरात टायटन्सविरुद्ध (GT) ऋद्धिमान साहाची विकेट घेत रबाडाने एक नवीन विक्रम नावावर केला. आता आयपीएलमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याच्या यादीत रबाडा पहिल्या स्थानावर आहे.
3/10

रबाडाने आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात 100 विकेट्स घेण्याचा विक्रम रचला आहे. यापूर्वी हा विक्रम माजी अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावावर होता. (PC : ESPNcricinfo)
4/10

आयपीएलच्या 16 व्या मोसमात गुजरात विरुद्धचा सामना रबाडाचा यंदाच्या मोसमातील पहिला सामना होता. कगिसो रबाडाचा आयपीएल टी-20 लीगमध्ये हा 64 वा सामना होता.
5/10

या सामन्यात रबाडाने आपल्या 100 विकेट्स पूर्ण केल्या. तो सर्वात जलद 100 विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे.
6/10

यापूर्वी लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये 70 डावात विकेट पूर्ण केल्या होत्या. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 81 डावात 100 विकेट पूर्ण घेतल्या आहेत. (PC : ESPNcricinfo)
7/10

आयपीएलमध्ये 100 विकेट्स घेण्याच्या कगिसो रबाडाने सर्वात कमी डावात ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याने उर्वरित गोलंदाजांच्या तुलनेत कमीत कमी चेंडू टाकले आहेत.
8/10

रबाडाने आयपीएलमध्ये 100 विकेट पूर्ण करण्यासाठी एकूण 1438 चेंडू टाकले आहेत. यामध्ये, लसिथ मलिंगाचे नाव दुसर्या क्रमांकावर आहे. त्याने 1622 चेंडूंमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत.
9/10

कगिसो रबाडा दक्षिण आफ्रिकन खेळाडू आहे. कगिसो रबाडाने 2018 साली दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं.
10/10

रबाडा आयपीएलमध्ये आतापर्यंत 64 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 100 विकेट घेतल्या असून त्याची सरासरी 19.84 आहे. रबाडाची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी करत एका सामन्यात 21 धावांत 4 बळी घेतले होते.
Published at : 14 Apr 2023 10:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
