एक्स्प्लोर
चेन्नईच्या विजयात 'या' तीन मराठमोळ्या खेळाडूंचा सिंहाचा वाटा; CSK साठी केलीये लाखमोलाची कामगिरी
IPL 2023 : चेन्नईनं आयपीएलचा पाचवा खिताब जिंकला. चेन्नईच्या या यशात संघातील प्रत्येक खेळाडूचं मोलाचं योगदान आहे, पण तीन मराठमोळ्या खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे.

IPL 2023 Final | Chennai Super Kings
1/9

Chennai Super Kings : चेन्नईनं गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएलता खिताब पटकावला. पावसामुळे पहिल्या दिवशी सामन्याचा बेरंग झाला आणि सामना रद्द झाला. त्यामुळे सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला. दुसऱ्या दिवशी सामना झाला खरा पण पहिल्या इनिंगनंतर पुन्हा पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. अखेर पाऊस थांबला आणि रात्री 12.15च्या सुमारास चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरला.
2/9

डकवर्थ लुईस नियमानुसार, चेन्नईनं 5 गडी राखून विजय मिळवला. पण चेन्नईच्या या यशात 3 मराठमोळ्या खेळाडूंचंही मोठं योगदान होतं. या तिघांनीही चेन्नईला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं.
3/9

चेन्नईच्या यशात संघातील प्रत्येक खेळाडूचं मोठं योगदान होतं. पण चेन्नईसाठी लाखमोलाची कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये तीन मराठमोळ्या खेळाडूंचा सिंहाचा वाटा होता. हे तिघं म्हणजे, अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड अन् तुषार देशपांडे.
4/9

फॉर्म गमावून बसलेला अजिंक्य रहाणे आयपीएल 2023च्या हंगामात पुन्हा फॉर्मात आला. अजिंक्यची सावध पण क्लासी फटकेबाजी चाहत्यांना यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा अनुभवता आली. धोनीनं दाखवलेला विश्वासावर रहाणे खरा उतरला. अजिंक्य रहाणेनं आयपीएल 2023 मधील 14 सामन्यांपैकी 11 डावांत फलंदाजी करताना 326 धावा लगावल्या. तसेच, गरजेच्या वेळी अजिंक्य रहाणे चेन्नईसाठी उभा राहिला आणि त्यानं चेन्नईचा विजयापर्यंतचा प्रवास सोपा केला. यंदाच्या हंगामात रहाणेनं सरासरी 175च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. यामध्ये 2 अर्धशतकांचाही समावेश आहे.
5/9

आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका आणि लेक आर्या दोघीही उपस्थित होत्या. जिंकल्यानंतर रहाणेनं ट्रॉफी हातात घेऊन एक फॅमिली फोटो काढला.
6/9

पुण्याचा ऋतुराज गायकवाड यंदाच्या हंगामात चेन्नईचा ओपनिंग बॅट्समन होता. चेन्नईसाठी मराठमोळ्या ऋतुराजनं तुफान फटकेबाजी केली. या हंगामात ऋतुराजनं 16 सामन्यांतील 15 डावांमध्ये 4 अर्धशतकं झळकावली. यंदाच्या हंगामात ऋतुराज गायकवाडनं 590 धावा केल्या.
7/9

ऋतुराज गायकवाडनं आयपीएल ट्रॉफीसोबत फोटो काढला आहे. ऋतुराज गायकवाड लवकरच आपली लग्नगाठ बांधणार आहे.
8/9

चेन्नईच्या संघात असलेला तिसरा आणि अत्यंत चमकदार कामगिरी करणारा मराठमोळा खेळाडू म्हणजे, तुषार देशपांडे. तुषारनं यंदाच्या हंगामात चेन्नईकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
9/9

तुषार देशपांडेनं 16 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेत आपली छाप सोडली.
Published at : 30 May 2023 12:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
नाशिक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
