एक्स्प्लोर
Virat Kohli Record : बंगळुरूमध्ये कोहलीची 'विराट गर्जना', 'हा' मोठा पराक्रम करणार चौथा भारतीय
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ९ हजार धावांचा आकडा पार केला.

Virat Kohli
1/5

विराट कोहलीने कारकिर्दीतील 116व्या कसोटीच्या 197व्या डावात 9 हजार धावा पूर्ण केल्या. बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने 53 धावांचा टप्पा ओलांडताच तो महान भारतीय खेळाडूंच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला. विराटने 70 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि यानंतर 9 हजार धावा पूर्ण केल्या
2/5

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9 हजार धावा पूर्ण करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. हा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने 104, गावसकरने 110 आणि सचिन तेंडुलकरने कारकिर्दीतील 111व्या कसोटीत ही कामगिरी केली. तर विराट कोहलीला यासाठी 116 कसोटी खेळाव्या लागल्या.
3/5

भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने 200 कसोटी सामन्यांच्या 329 डावांमध्ये 53.78 च्या सरासरीने 15921 धावा केल्या, जे सर्वोच्च आहे.
4/5

भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक आणि तेजस्वी फलंदाज राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. द्रविडने 163 सामन्यांच्या 284 डावांमध्ये 52.63 च्या सरासरीने 13265 धावा केल्या आहेत.
5/5

भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुनील गावसकर तिसऱ्या स्थानावर आहेत. गावसकर यांनी 125 कसोटी सामन्यांच्या 214 डावांमध्ये 51.12 च्या सरासरीने 10,122 धावा केल्या आहेत.
Published at : 18 Oct 2024 05:23 PM (IST)
Tags :
VIRAT KOHLIअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion