एक्स्प्लोर
IPL 2023 : ऐन IPL मध्ये मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ? विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नीचा आरोप; अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव
Mohammed Shami Hasin Jahan Controversy : क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप लावत त्याच्या अटकेची मागणी केली आहे.

Mohammed Shami Hasin Jahan Controversy
1/9

मोहम्मद शमीच्या अटक वॉरंटवर सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती. शमीची पत्नी हसीनने आता त्याच्या अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयाचं दारं ठोठावलं आहे.
2/9

हसीन जहाँने तिच्या याचिकेत कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं आहे. यामध्ये शमीविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटवर सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती. शमीची पत्नी हसीनने आता त्याच्या अटकेसाठी सुप्रीम कोर्टाचं दारं ठोठावलं आहे.
3/9

शमीच्या पत्नीने कोर्टात याचिका दाखल केली आहे. पत्नी हसीन जहाँने शमीवर आरोप केले आहेत. तिच्या आरोपांनुसार, शमीचे विवाहबाह्य संबंध होते आणि तो हुंड्यासाठी तिचा छळही करायचा.
4/9

मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. जानेवारीमध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने मोहम्मद शमीला पत्नीला दरमहा 1.30 लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते.
5/9

तर पत्नीने 10 लाखांची मागणी केली होती. यादरम्यान शमीच्या अटकेलाही स्थगिती देण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या हसीन जहाँने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
6/9

हसीन जहाँने याचिकेत म्हटलंय की, कायद्यानुसार कोणत्याही सेलिब्रिटीला विशेष स्थान मिळू नये. न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे.
7/9

हसीनने शमीवर गंभीर आरोप करत म्हटलं आहे की, शमीचे विवाहबाह्य संबंध होते आणि तो क्रिकेट दौऱ्याच्या वेळी हॉटेलमध्ये कॉल गर्ल्सना बोलवायचा.
8/9

या प्रकरणात, अलीपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने 29 ऑगस्ट 2019 रोजी शमीविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. शमीने मात्र या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिलं. यावेळी न्यायालयाने अटक वॉरंट आणि संपूर्ण प्रकरणातील पुढील कार्यवाहीला स्थगिती देण्याचा निर्णय दिला.
9/9

यानंतर हसीन जहाँने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु उच्च न्यायालयानेही अटक वॉरंटवरील स्थगिती उठवण्यास नकार दिला. आता हसीनने सर्वोच्च न्यायायलात धाव घेतली आहे.
Published at : 03 May 2023 12:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion