एक्स्प्लोर
Pankaja Munde : पंकजाताईंच्या मेळाव्याला भगवान गडावर मोठी गर्दी, समर्थकांच्या हाती गोपीनाथ मुंडेंचे फोटो, भगवानबाबांची आकर्षक मूर्ती
Pankaja Munde : दरवर्षी प्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडत आहे. यावेळी मुंडे समर्थकांनी तुफान गर्दी केली आहे.

Photo Credit - abp majha reporter
1/10

Pankaja Munde , Beed : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडणार आहे.
2/10

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंडे समर्थकांनी भगवान गडावर मोठी गर्दी केली आहे.
3/10

भगवान गडावरील मुंडे समर्थकांच्या हाती गोपीनाथ मुंडेंचे फोटो आहेत.
4/10

दरम्यान, दसरा मेळाव्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
5/10

पंकजा मुंडे म्हणाल्या, भगवान भक्ती गडावर मी गेल्या दहा वर्षापासून दसरा मेळावा करत आहे. सात वर्षांच्यावर सावरगाव येथे हा मेळावा होत आहे.
6/10

त्या ठिकाणी आम्ही भगवान बाबांची मूर्ती निर्माण केली आहे. दरवर्षी आम्ही तिथे जातो सोनं लुटतो आणि सिमोलंघन करतो.
7/10

धनंजय मुंडे आणि मी आम्ही एकत्र कधीच दसरा मेळावा केला नाही. दसरा मेळावा हा मुंडे साहेबांचा असायचा, आणि आम्ही समोर मांडी घालून बसलेला असायचो, आम्ही काय भाषण करायचो नाही. धनंजय मुंडेंना आणि मला एकाच मंचावर येण्याची सवय झाली आहे.
8/10

या भगवानगडावरून मी संदेश देत असते. यावर्षी पहिल्यांदाच नारायण गडावर दसरा मेळावा होत आहे, त्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील काय बोलणार याची मलाही उत्सुकता आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
9/10

मात्र आमचा मेळावा पारंपारिक आहे, तो मेळावा काही पारंपारिक नाही. ओबीसी मराठा संघर्षावर मी माझ्या भाषणात बोलणार ओबीसी मराठा संघर्ष असा रंग माझ्या मेळाव्याला नसणार आहे, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं.
10/10

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच माझा मेळावा येत असतो, मात्र हे काही राजकीय व्यासपीठ नाही. मात्र माझ्या भाषणातून सामाजिक, राजकीय संदेश नक्की दिला जाईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
Published at : 12 Oct 2024 12:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion