एक्स्प्लोर
No Honking Day : आज 'नो हॅांकिंग डे', मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून जनजागृती!
No Honking Day : मुंबईत आज 'नो हॉंकींग डे', नियमांचं उल्लघंन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिस कारवाई करणार!

No Honking Day
1/12

मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने (Mumbai Traffic Police ) आज (9 ऑगस्ट) विशेष मोहीम राबवली आहे.
2/12

आज मुंबईत 'नो हॉंकिंग डे' (NoHonkDay) मोहिम राबवण्यात येणार आहे. ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आज मुंबईत 'नो हॉंकिंग डे' पाळण्यात येणार आहे.
3/12

यामध्ये हॉर्न संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
4/12

तर विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
5/12

तसेच येत्या 16 ऑगस्टला देखील 'नो हॉंकींग डे' पाळण्यात येणार आहे.
6/12

ध्वनी प्रदुषण आणि त्याचा सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम यावर उपाय म्हणून मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं हे पाऊल उचललं आहे.
7/12

ध्वनी प्रदुषणामुळं पर्यावरण आणि मानवी आरोग्य यावर परिणाम होतो. त्यामुळं वाहनचालकांनी हॉर्न वाजवण्यापासून दूर राहून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
8/12

या मोहिमेच्या माध्यमातून सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना नो हॉन्किंग चिन्ह/बॅनर दाखवेल जाईल.
9/12

त्याचबरोबर नो हॉर्निंगच्या मुद्द्यावर चालकांना मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात येणार आहे.
10/12

दरम्यान, सातत्यानं मुंबई वाहतूक पोलिसांकडून मुंबईतील अनेक भागात याबाबत जनजागृती करण्यात येत आहे
11/12

पोलिनांनी वाहचालकांना भेटून याबाबत माहिती देखील दिली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या ट्विटरवर या मोहिमेबद्दल माहिती देण्यात आली आहे.
12/12

दरम्यान, वाहनचालकांना त्यांच्या वाहनांचे हॉर्न आणि सायलेन्सर हे 1989 च्या केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या नियम क्र. 119 आणि 120 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आहेत याची खात्री करण्याचे आवाहन देखील मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं केलं आहे.
Published at : 09 Aug 2023 02:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
