एक्स्प्लोर
Latur Accident: चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार पलटली; एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला
Latur Accident News: पुण्याहून लग्न आटोपून परतताना कुटुंबावर काळाचा घाला. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.

Latur Accident News
1/8

लातूरच्या चलबुर्गा पाटीजवळ कार उलटून भीषण अपघात झाला आहे.
2/8

निलंगा महामार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे.
3/8

यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून लातूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
4/8

पुण्याहून लग्न समारंभ आटपून गावी परतताना भीषण अपघात झाला.
5/8

चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं पुलाखाली कार पलटी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सर्व व्यक्ती निलंगा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
6/8

निलंगा येथील रहिवासी सचिन बडूरकर (रा. दत्तनगर) हे कुटुंबासह पुणे येथून निलंग्याकडे येत होतं.
7/8

दरम्यान, कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटली. त्यात सचिन यांची दोन मुलं, एक पुतण्या आणि एक मेव्हणा जागीच ठार झाले. तर सचिन बडूरकर, त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत.
8/8

अपघातातील जखमींवर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
Published at : 27 Mar 2023 11:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
चंद्रपूर
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
