एक्स्प्लोर
Ganeshotsav: माजी मंत्री अर्जुन खोतकरांच्या घरी 'बाप्पा'चे आगमन, पाहा फोटो
Ganeshotsav : देशभरात आज मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात असून, अनेक राजकीय नेत्यांच्या घरी देखील 'बाप्पा'चे आगमन होतांना पाहायला मिळत आहे.

Arjun Khotkar house Ganeshotsav
1/8

माजी मंत्री व शिवसेना नेते (शिंदे गट) अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील दर्शना या निवासस्थानी बाप्पाचे मोठ्या थाटात आगमन झाले.
2/8

यावेळी अर्जुन खोतकर यांच्यासह पत्नी सीमा खोतकर आणि संपूर्ण कुटुंबाने विधिवत पूजा करत बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली.
3/8

दरवर्षी खोतकर कुटुंबिय लाडक्या बाप्पाची मोठ्या हर्ष उल्हासात घरी प्राणप्रतिष्ठा करत असतात.
4/8

दरम्यान यंदाही मोठ्या उत्साहात खोतकर कुटुंबीयांनी बाप्पाला आपल्या घरी आणले.
5/8

यावेळी बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मोठी सजावट करण्यात आली होती.
6/8

गणपती बाप्पा मोरया अशी घोषणा देत खोतकर कुटुंबीयांनी बाप्पांचे स्वागत केले.
7/8

यावेळी अर्जुन खोतकर यांच्या हस्ते आरती करून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
8/8

तर, यावेळी दुष्काळाचे दुष्टचक्र पाहता गणपतीच्या या 10 दिवसात वरुण राजाची कृपा व्हावी आणि शेतकऱ्यांचे विघ्न दूर होऊ दे अशी प्रार्थना यावेळी अर्जुन खोतकरांनी गणरायाला केली.
Published at : 19 Sep 2023 04:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
