एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Aurangabad Marriage : औरंगाबादमधील सांचीच्या लग्नात 'लंडन ठुमकदा', लंडनहून आलेल्या वऱ्हाडाची चर्चा
Aurangabad News: एडवर्ड औरंगाबादच्या सांची नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. एडवर्ड आणि सांची 2019 पासून इंग्लंडमध्ये सोबत होते.
![Aurangabad News: एडवर्ड औरंगाबादच्या सांची नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. एडवर्ड आणि सांची 2019 पासून इंग्लंडमध्ये सोबत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/75d5fe2d1f776cbffd5eb7007d23d8aa167541795776189_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/12
![लक्ष्मणरावांनी 'वऱ्हाड निघालंय लंडन'ला साकारलं... मात्र आता 'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबादला अशी नाट्यकृती साकारायला हरकत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/263b8504e7989bd10226321c1fba0cb140f6b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लक्ष्मणरावांनी 'वऱ्हाड निघालंय लंडन'ला साकारलं... मात्र आता 'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबादला अशी नाट्यकृती साकारायला हरकत नाही.
2/12
![औरंगाबादमध्ये (Aurangabad) पार पडलेलं एक 'आंतरराष्ट्रीय' लगीन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लंडनचे (London) पाहुणे नाच-नाच नाचले. नवरदेव एडवर्ड घोड्यासोबत...लंडनचे वऱ्हाडी बँडच्या तालावर.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/1a8ab48ad33ea9b72555ac85f049fc5656526.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादमध्ये (Aurangabad) पार पडलेलं एक 'आंतरराष्ट्रीय' लगीन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लंडनचे (London) पाहुणे नाच-नाच नाचले. नवरदेव एडवर्ड घोड्यासोबत...लंडनचे वऱ्हाडी बँडच्या तालावर.
3/12
![औरंगाबादची सांची इंग्लंडच्या एका मुलाच्या प्रेमात पडली, दोघांचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले आणि अगदी भारतीय पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/241863d55533b3589258b1ac9bf882064a311.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादची सांची इंग्लंडच्या एका मुलाच्या प्रेमात पडली, दोघांचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले आणि अगदी भारतीय पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.
4/12
![भारतीय गाण्यावर थिरकत लंडनचे क्लेश कुटुंबीय अगदी भारतीय वेश परिधान करुन लग्नात ही सगळी मंडळी सहभागी झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/9de0e3bee6ce74ad1162712ce3a1ed10b7d22.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय गाण्यावर थिरकत लंडनचे क्लेश कुटुंबीय अगदी भारतीय वेश परिधान करुन लग्नात ही सगळी मंडळी सहभागी झाली.
5/12
![लंडनचा एडवर्ड हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. एडवर्ड औरंगाबादच्या सांची नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/cf4639d009b2e7b600a4bbac6d296c730a978.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लंडनचा एडवर्ड हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. एडवर्ड औरंगाबादच्या सांची नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला.
6/12
![एडवर्ड आणि सांची 2019 पासून इंग्लंडमध्ये सोबत होते. तीन वर्षांनी लग्नाबाबत घरी सांगितलं आणि घरच्यांनी लग्नासाठी होकार दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/e9d9abaf913ef84856f41699f3e03888ca315.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एडवर्ड आणि सांची 2019 पासून इंग्लंडमध्ये सोबत होते. तीन वर्षांनी लग्नाबाबत घरी सांगितलं आणि घरच्यांनी लग्नासाठी होकार दिला.
7/12
![अट मात्र एकच होती की, लग्न भारतात म्हणजे औरंगाबादमध्ये व्हावं आणि तेही भारतीय बौद्ध पद्धतीने झाले पाहिजे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/0ed95807208dd0a71a5f3aa213eed8d4f637b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अट मात्र एकच होती की, लग्न भारतात म्हणजे औरंगाबादमध्ये व्हावं आणि तेही भारतीय बौद्ध पद्धतीने झाले पाहिजे.
8/12
![ब्रिटनमध्ये लग्न म्हणजे एक तासाचा सोहळा असतो. मात्र भारतात लग्न म्हणजे चार दिवसांचं सोहळा आहे आणि हे सगळं आनंदादायक असल्याची प्रतिक्रिया यावेळेस एडवर्डच्या वडिलांनी दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/01b4525098a1231126cc3eb21547a420ba6a9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्रिटनमध्ये लग्न म्हणजे एक तासाचा सोहळा असतो. मात्र भारतात लग्न म्हणजे चार दिवसांचं सोहळा आहे आणि हे सगळं आनंदादायक असल्याची प्रतिक्रिया यावेळेस एडवर्डच्या वडिलांनी दिली.
9/12
![तर त्याच्या बहिणीने सुद्धा भारतीय पद्धतीने लग्न होत असल्याने आनंद होत असल्याचा सांगितलं. तर जातीपातीच्या भिंती तोडून हे लग्न होत असल्याचा आनंद आहे असे मुलीच्या वडिलांनी सांगितलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/98dc94f8030ae0c8a0f216e6c81ec96f9b239.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर त्याच्या बहिणीने सुद्धा भारतीय पद्धतीने लग्न होत असल्याने आनंद होत असल्याचा सांगितलं. तर जातीपातीच्या भिंती तोडून हे लग्न होत असल्याचा आनंद आहे असे मुलीच्या वडिलांनी सांगितलं.
10/12
![सांची आता कायमची सातासमुद्र पार राहायला जाणार याचं दुःख आहे मात्र मुलगी एका चांगल्या कुटुंबात गेली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया यावेळेस रगडे कुटुंबियांनी दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/c03cb0b358251bd446ef5e4953bd86ae1441f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सांची आता कायमची सातासमुद्र पार राहायला जाणार याचं दुःख आहे मात्र मुलगी एका चांगल्या कुटुंबात गेली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया यावेळेस रगडे कुटुंबियांनी दिली.
11/12
![सगळे विधी यथासांग पार पडले... आणि कोणत्याही लग्नात हार घालताना होणारी धडपड इथंही झाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/7f7ee126c452aeb804b36a03385dfa4b3f757.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सगळे विधी यथासांग पार पडले... आणि कोणत्याही लग्नात हार घालताना होणारी धडपड इथंही झाली...
12/12
![लक्ष्मणरावांनी 'वऱ्हाड निघालंय लंडन'ला साकारलं... आता या लग्नानंतर कुणी तरी 'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबाद'ला साकारायला हरकत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/6679612004f410721abedc6b1b8d1ab89cbdd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लक्ष्मणरावांनी 'वऱ्हाड निघालंय लंडन'ला साकारलं... आता या लग्नानंतर कुणी तरी 'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबाद'ला साकारायला हरकत नाही.
Published at : 03 Feb 2023 03:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion