एक्स्प्लोर
Health Tips : फळबाजी ब्रोकोलीचे आरोग्यदायी फायदे
Health Tips : ब्रोकोली खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ही भाजी लहान मुले आणि वृद्धांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

Health Tips
1/8

ब्रोकोली ही एक हिरवी पालेभाजी आहे. जी दिसायला फ्लॉवर सारखीच दिसते.
2/8

ब्रोकोली हे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध पोषक तत्वांचा खजिना आहे. ही भाजी कच्ची किंवा विविध स्वादिष्ट पदार्थांमध्ये शिजवून खाता येते.
3/8

ब्रोकोलीची भाजी खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. हे फायदे कोणते ते जाणून घ्या.
4/8

ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. हाडांच्या आरोग्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस रोखण्यासाठी ब्रोकोली महत्त्वाची आहे. कॅल्शियमसोबतच, ब्रोकोलीमध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फरस यांसारख्या इतर पोषक तत्वांचाही समावेश असतो.
5/8

अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि तांबे, जस्त यांसारखी खनिजे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे त्वचेचा संसर्ग होण्यापासून वाचवते.
6/8

ब्रोकोलीमध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. ही सर्व पोषक तत्वे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
7/8

ब्रोकोलीमध्ये चांगले कार्बोहायड्रेट आणि फायबर समृद्ध आहे, जे पचनास मदत करते, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते, रक्तातील साखरेची पातळी कमी करते.
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 05 Feb 2023 08:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
गोंदिया
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
