एक्स्प्लोर
Beauty Tips : जर तुम्ही नुकतेच मेकअप करायला शिकलात तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा, मेकअप व्हॅनिटी अशी पूर्ण करा
Beauty Tips : मेकअप करण्यासाठी, आपल्या त्वचेचा शेड समजून घेणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही मेकअप एक्सपर्टचा सल्ला घेणंही तितकच आवश्यक आहे.

Beauty Tips lifestyle marathi news
1/7

ऑफिसला जाण्यापासून ते पार्टीला जाण्यापर्यंत सर्व तरुणी-महिलांना मेकअप करायला आवडते. अशात, प्रत्येक त्वचेच्या प्रकारासाठी वेगवेगले प्रॉडक्ट आणि टेक्निक अवलंबली जातात. विशेषत: जे मेकअप करायचा नुकतेच शिकलेत, त्यांनी या गोष्टी योग्यरित्या जाणून घेण्याचा सराव करावा
2/7

नवीनच शिकलेले असाल, तसेच मेकअपसाठी खूप पैसे खर्च करू इच्छित नसाल. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कमी पैसे खर्च करून तुमची मेकअप व्हॅनिटी कशी पूर्ण करू शकता. तसेच, आम्ही तुम्हाला मेकअपशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत-
3/7

काजळचा विविध उपयोग - डोळ्यांचा मेकअप कसाही केला तरी अगदी साधा लूक बनवण्यात काजळची भूमिका महत्त्वाची असते. काजळच्या मदतीने तुम्ही स्मोकी आय मेकअप सहज करू शकता. याशिवाय तुम्ही काजळचा वापर आयलायनर म्हणूनही करू शकता.
4/7

लिपस्टिकचा विविध उपयोग - ओठांव्यतिरिक्त, तुम्ही ब्लश आणि आय शॅडो म्हणून लिपस्टिक वापरू शकता. गुलाबी रंगाची लिपस्टिक यासाठी उपयुक्त ठरू शकते. याशिवाय, तुम्ही तपकिरी रंगाच्या लिपस्टिकच्या मदतीने कॉन्टूरिंग देखील करू शकता.
5/7

डोळ्यांच्या मेकअपसाठी कोणत्या प्रकारची आयशॅडो खरेदी करावी? - आय मेकअप करण्यासाठी, आपल्याला मोठ्या रंगाच्या पर्यायांसह अधिक महाग प्रॉडक्ट किंवा पॅलेट खरेदी करण्याची आवश्यकता नाही. यासाठी 10 ते 15 रंगांचे मिनी पॅलेट खरेदी करावे. रंगांसाठी, गुलाबी आणि तपकिरी सारख्या छटा निवडा.
6/7

बेस मेकअपसाठी कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात? तसं पाहायला गेलं तर नवशिक्यांसाठी, बेस मेकअप खूप महाग नाही, परंतु आपण फाउंडेशन वगळू शकता आणि व्हॅनिटीमध्ये कन्सीलरच्या दोन शेड्स समाविष्ट करू शकता. यासाठी तुमच्या स्किन टोननुसार 1 शेड लाइट आणि 1 शेड डार्क कलरचे कन्सीलर निवडा.
7/7

मेकअप कसा सेट करायचा? - मेकअप जास्त काळ टिकण्यासाठी, तुम्ही व्हॅनिटीमध्ये मेकअप पावडर म्हणजेच कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेच्या शेडची विशेष काळजी घेतली पाहिजे.
Published at : 19 Jul 2024 03:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion