Zero Hour Full Episode : बीड जिल्हा गुन्हेगारीमुक्त कधी होणार? हिंसेवर उपाय काय?
Zero Hour Full Episode : बीड जिल्हा गुन्हेगारीमुक्त कधी होणार? हिंसेवर उपाय काय?
देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला आज तीन महिने पूर्ण झालेत.. गेल्या तीन महिन्यांत फडणवीस सरकारसाठी सगळ्यात आव्हानात्मक कोणती गोष्ट बनली असेल.. तर ते होतं.. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण... आणि मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा..
आणि सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून बीडचं हेच प्रकरण गाजतंय.. त्यात धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.. आणि वाटलं की आता अधिवेशनात हे बीड प्रकरण संपेल..
पण.. तसं झालं नाही...
कारण, बीड जिल्ह्यातील दहशतीचा आणखी एक व्हिडीओ काल संध्याकाळी समोर आला.. आणि पुन्हा वातावरण तापलं.. या व्हिडीओत तीन-चारजण मिळून एकाला बेदम मारहाण करतायत.. पुढच्या काही तासांमध्येच त्या मारहाण करणाऱ्यांची ओळख पटली... आणि पुढे आलं आमदार सुरेश धस यांचं नाव...
हेच सुरेश धस.. गेल्या ९० दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आंदोलनात लीड रोलमध्ये आहेत.. धनंजय मुंडे यांच्याविरोधात सर्वात आक्रमकपणे धस यांनीही संघर्ष उभा केला.. वाल्मिक कराडच्या अटकेपासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यापर्यंत.. सुरेश धस यांनी आपला लढा मागे पडू दिला नाही..
आणि आता व्हायरल झालेल्या व्हिडीओतील मुख्य आरोपी... हा सुरेश धस यांचाच कट्टर समर्थक असल्याचं समोर आलंय... त्याचं नाव आहे.. सतीश भोसले... उर्फ खोक्या..
हा मारहाणीचा व्हिडीओ आहे.. बीड जिल्ह्यातील शिरुरकासारमधला.. अर्धनग्न व्यक्तीला बॅटनं मारहाण करणारा.. दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे.. सतीश भोसले.. त्याची अख्खी कुंडलीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी सोशल मीडियावर आणलीय.. त्यावरून आता आमदार सुरेश धस यांनाही उत्तर द्याव लागलंय.
All Shows
































