एक्स्प्लोर
मुघल-ए-आझम ते ताजमहल! मुघलकालीन प्रेमकथा असलेले 'हे' भन्नाट चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
बॉलीवुड सिनेसृष्टीत मुघलकालीनप्रेमकथांवर बरेच चित्रपट आलेले आहेत. यातील बरेच चित्रपट तुम्हाला वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर पाहता येतील.

मुघलकालीन प्रेमकथांवर आधारित हिंदी चित्रपट.
1/5

भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात 'मुघल-ए-आझम' या चित्रपटाला विशेष स्थान आहे. दिग्गज अभिनेते दिलीप कुमार, मधुबाला आणि पृथ्वीराज कपूर स्टारर या चित्रपटचे आसिफ यांनी दिग्दर्शिन केले होते.
2/5

मुघलकालीन प्रेमकथांवर आधारलेल्या चित्रपटांत 'जोधा अकबर' या चित्रपटाचाही समावेश आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. याच चित्रपटात अभिनेता ऋतिक रोशन अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांनी प्रमुख भूमिका केलेली आहे. हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
3/5

1945 मध्ये प्रदर्शित झालेला 'हुमायून' हा चित्रपट महमूद खान यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाची कथा प्रोफेसर वकीफ मुरादाबादी यांनी लिहिलेली आहे. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता.
4/5

1964 मध्ये प्रदर्शित झालेला 'जहां आरा' हा चित्रपट विनोद कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचे मदन मोहन यांनी संगित दिले होते. हा चित्रपट ओटीटीवर मोफत पाहू शकता. या चित्रपटात अभिनेता भूषण आणि अभिनेत्री माला सिन्हा प्रमुख भूमिकेत आहेत.
5/5

एम सादिक दिग्दर्शित 'ताजमहल' या चित्रपटाची निर्मिती एके नाडिया़वाला यांनी केली आहे. या चित्रपटात शाहाजहानची जीवनकथा दाखवली आहे. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता.
Published at : 09 Aug 2024 03:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
