एक्स्प्लोर
Anant-Radhika Wedding : अनंत-राधिकासाठीच्या पूजेत वरमाई नीता अंबानींची हवा, सोन्याच्या ब्लाऊजने वेधले लक्ष
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नानिमित्ताने विधी सुरू आहेत. त्यानिमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमात वरमाई नीता अंबानी या सगळ्याच कार्यक्रमात लक्ष वेधून घेत आहेत.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटसोबत 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या या जोडप्याच्या प्री-वेडिंग फंक्शनची जोरदार चर्चा आहे. सर्व बॉलिवूड सेलिब्रिटी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनच्या ग्लॅमरमध्ये भर घालताना दिसत आहेत. या सगळ्यामध्ये अनंत अंबानी यांची आई नीता अंबानी या त्यांच्या लूकने खूप चर्चेत आहेत. अनंत आणि राधिकासाठी आयोजित केलेल्या विशेष पूजेमध्येही नीता अंबानींनी आपल्या लेटेस्ट लुकने सर्वांना आश्चर्यचकित केले.
1/8

बुधवारी, अनंत आणि राधिकासाठी खास शिवपूजेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान नीता अंबानी यांनी आपल्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले. नीता अंबानी त्यांचा मुलगा आणि भावी सुनेसाठी आयोजित केलेल्या विशेष पूजेमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या.
2/8

नीता अंबानी अनंत-राधिकाच्या विशेष पूजेला अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला हेव्ही एम्ब्राइडरी असलेला लेहेंगा-चोली परिधान केला होता. यावेळी नीता खूपच सुंदर दिसत होत्या.
3/8

नीता अंबानी यांचा ग्रीन आणि ब्लू कलरचा मिलाफ असलेला लेहेंगा हाताने भरतकाम केलेला होता. त्याची खास गोष्ट म्हणजे त्यावर सोन्याच्या कामासह मिनिट मिरर वर्क करण्यात आले.
4/8

नीता अंबानीच्या लेहेंग्याची बॉर्डर झिगझॅग लाईन्समध्ये एम्ब्रॉइडरी केलेली होती. सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे नीता अंबानी यांचा ब्लाउज. नीता अंबानी यांनी सोन्याचा ब्लाउज घातला होता.
5/8

नीता अंबानींच्या या सोन्याच्या ब्लाउजला राउंड नेकलाइन होते. यामध्ये सोन्याचे डिटेलिंग करण्यात आले होते.
6/8

त्यांच्या लुकला अधिक ग्रेस देण्यासाठी नीता अंबानी यांनी निळ्या रंगाचा सॅटिन दुपट्टा देखील जोडला. नीतांच्या या दुपट्ट्यावर खास डिझाईन होती.
7/8

नीता अंबानी यांनी त्यांचा लूक डायमंड, रुबी ज्वेलरीने पूर्ण केला. तिने 6 समान आकाराच्या माणिकांनी जोडलेला पोल्की नेकलेस घातला होता. ज्यामध्ये मध्यभागी अंडाकृती आणि वर्तुळाचे माणिक सर्वात मोठे होते. हातात माणिक असलेल्या बांगड्या घातल्या.
8/8

यावेळी न्यूड मेकअप आणि ब्राऊन काजलसह साइड पार्टीशन असलेल्या बनमध्ये नीता खूपच सुंदर दिसत होत्या. सोनेरी ब्लाउजसह ब्लू-ग्रीन कॉम्बिनेशनसह नीताचा लूक खूपच जबरदस्त होता. या काळात त्याच्यापासून नजर हटवणे कठीण होत होते.
Published at : 11 Jul 2024 08:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion