एक्स्प्लोर
Lok Sabha Election Results 2024 : मुंबईत ठाकरेंची मशाल पेटली; उमेदवारांचा दणदणीत विजय, मुंबईचे नवे खासदार कोण? पाहा
Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचा फायनल निकाल लागला आहे. ठाकरे गटाने पुन्हा एकदा मुंबईचा गड राखला आहे. लोकसभा 2024 निवडणुकीत मुंबईतून कोण-कोण विजयी? पाहा नवीन खासदारांची संपूर्ण यादी

Lok sabha Election Results 2024 Mumbai Winning Candidates
1/6

दक्षिण मुंबईचा गड ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांनी राखला आहे. शिंदे गटाच्या यामिनी जाधव पराभूत झाल्या आहेत.
2/6

वायव्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर 2 हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांचा पराभव झाला आहे.
3/6

ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा दारुण पराभव झाला आहे.
4/6

दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा पराभव झाला आहे.
5/6

उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे.
6/6

उत्तर मुंबईत भाजपचे पियूष गोयल विजयी झाले आहेत, तर काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव झाला आहे.
Published at : 04 Jun 2024 08:31 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
