एक्स्प्लोर
Chanakya Niti : पहाटे पाहिलेल्या 'या' 7 स्वप्नांचा अर्थ काय? चाणक्य सांगतात...
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या मूल्यांचा वापर आजही आपल्या दैनंदिन जीवनात करता येतो.

Chanakya Niti
1/10

आचार्य चाणक्य यांनी आपल्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा आपल्या नीतिशास्त्रात केला आहे. ज्याचा वापर आजही आपल्या दैनंदिन जीवनात करता येतो. अशाच प्रकारे चाणक्य यांनी स्वप्नात येणाऱ्या अनेक गोष्टींचा संबंध नेमका कशाशी असतो हे सांगितले आहे.
2/10

सकाळ-सकाळ जर तुम्हाला स्वप्नात कावळा दिसत असेल तर समजून जा की तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.
3/10

जर स्वप्नात तुम्हाला मृत व्यक्ती दिसली तर याचा अर्थ लवकरच तुमचं नशीब बदलणार आहे असा होतो.
4/10

स्वप्नात जर तुम्हाला बासरी दिसली तर ते शुभ मानलं जातं. यामुळे तुमचं वैवाहिक जीवन सुखी राहतं.
5/10

जर तुम्हाला स्वप्नात घुबड दिसत असेल तर यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
6/10

स्वप्नात कात्री दिसणं अशुभ मानलं जातं. यामुळे घरात नकारात्मक वातावरण पसरतं. तसेच, यामुळे तुमच्या वैवाहिक नात्यातही दुरावा येण्याची शक्यता असते.
7/10

जर स्वप्नात तुम्हाला अस्थी दिसली की समजून जा की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे.
8/10

जर स्वप्नात तुम्हाला विधवा स्त्री दिसली तर समजून जा तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे.
9/10

तसेच, जर तुम्हाला विवाहीत स्त्री दिसली तर समजून जा लवकरच तुमच्या मुला-मुलींचं लग्न होण्याची शक्यता आहे.
10/10

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 04 Nov 2024 02:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion