एक्स्प्लोर
Aashadhi Wari 2024 : पंढरीची वारी...लागलीया आस...! संत गजानन महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीसाठी शेगावातून पंढरपूरकडे प्रस्थान
Aashadhi Wari 2024 : जून महिना हा आषाढी वारीचा महिना मानला जातो. या दरम्यान विविध ठिकाणांहून पालख्या निघून त्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात.

Aashadhi Wari 2024
1/10

सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूर येथे जात असते.
2/10

यंदाही पालखीचं शेगाव येथून पंढरपूरसाठी प्रस्थान होत आहे.
3/10

यंदा दिंडीचे हे 55 वं वर्ष आहे. जवळपास 700 वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान होत आहे.
4/10

या दिंडीत 700 वारकरी ,250 पताकाधारी 250 टाळकरी 200 सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी मंदिरातून प्रस्थान होत आहे.
5/10

तर पुढील एक महिना दोन दिवस पायी प्रवास करून 15 जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे .
6/10

पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहेत.
7/10

आषाढी सोहळा संपल्यावर पालखी 21 जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघून 11 ऑगस्ट रोजी शेगावात पोहोचेल.
8/10

आज पालखी प्रस्थान सोहळ्याला नवं नियुक्त केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित आहेत.
9/10

गण गण गणात बोतेच्या गजरात आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा संपन्न होत आहे.
10/10

एकूणच वारकऱ्यांचा आनंद आणि उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय.
Published at : 13 Jun 2024 08:13 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
नाशिक
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
