World Photography Day: आज जागतिक फोटोग्राफी दिन, का साजरा केला जातो हा दिवस...
World Photography Day: आज जागतिक फोटोग्राफी दिन. प्रत्येक फोटोग्राफर साठी हा महत्वाचा दिवस. 19 ऑगस्ट रोजी हा दिवस हा साजरा केला जातो यामागची काही कारणं आहेत.
World Photography Day: आज जागतिक फोटोग्राफी दिन. प्रत्येक फोटोग्राफर साठी हा महत्वाचा दिवस. 19 ऑगस्ट रोजी हा दिवस हा साजरा केला जातो यामागची काही कारणं आहेत. हा दिवस साजरा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जगभरातील फोटोग्राफर्सला चांगले फोटो काढण्यासाठी प्रोत्साहित करणं, सोबतच त्यांनी काढलेल्या खास फोटोंना जगभरातील फोटो प्रेमींच्या समक्ष प्रस्तुत करणं.
कधी झाली या दिनाची सुरुवात
माहितीनुसार जागतिक फोटोग्राफी दिनाची सुरुवात तशी 2010 पासून झाली मात्र याचा इतिहास खूप जुना आहे. फ्रान्समधील जोसेफ नीसफोर निपसे आणि लुईस डॅगुएरे नावाच्या दोन व्यक्तिंनी ‘डॅगुएरोटाइप’ चा शोध लावून प्रथमच छायाचित्रण प्रक्रिया विकसित केली. फ्रेंच अॅकॅडमी ऑफ सायन्सने 9 जानेवारी 1837 रोजी अधिकृतपणे डॅग्युरिओटाइपचा शोध जाहीर केला. ही घोषणा झाल्यानंतर 10 दिवसांनी फ्रेंच सरकारने आविष्काराचे पेटंट खरेदी केले आणि ते जगाला भेट म्हणून दिले कॉपीराइट न ठेवता दिले.19 ऑगस्ट 1939 रोजी सरकारकडून याची घोषणा करण्यात आली. म्हणून हा दिवस ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ म्हणजेच जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो.
1839 मध्ये विल्यम हेन्री फॉक्स टालाबॉटने छायाचित्र काढण्याची प्रक्रिया सुलभ केली. टालाबॉट यांनी कागदावर आधारित मीठ प्रिंट वापरून एक अधिक अष्टपैलू छायाचित्रण प्रक्रिया शोध लावला. तसेच अमेरिकेचे फोटो प्रेमी रॉबर्ट कॉर्नेलियस (Robert Cornelius) यांना जगातील पहिले सेल्फी क्लिक करणारे व्यक्ती मानले जातात. त्यांनी 1839 मध्ये ही सेल्फी काढली होती.
यंदा काय थीम आहे?
वर्ल्ड फोटोग्राफी डे वेबसाइटनुसार यंदा #WorldPhotographyDay चे 10 लाख टॅग्स बनवण्याची योजना आहे. आयोजकांचं म्हणणं आहे की या हॅशटॅगसह जास्तीत जास्त फोटो शेअर करा. कोरोना काळात सेलिब्रेट होणार हा दुसरा जागतिक फोटोग्राफी दिन आहे. यामुळं यंदाची थीम Pandemic lockdown through the lens म्हणजेच लेंसच्या माध्यमातून महामारीचं लॉकडाऊन अशी आहे.