Russia Ukraine Crisis : रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर कीव्हच्या मॉलमध्ये आग, 16 जणांचा मृत्यू; आगीचा व्हिडीओ व्हायरल
Ukraine Crisis : रशियाने कीवमधील एका मॉलवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर या मॉलमध्ये लागलेल्या यादीत 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
![Russia Ukraine Crisis : रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर कीव्हच्या मॉलमध्ये आग, 16 जणांचा मृत्यू; आगीचा व्हिडीओ व्हायरल Russia Ukraine War missile strike hits crowded mall in east ukraine deaths reported authorities Russia Ukraine Crisis : रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर कीव्हच्या मॉलमध्ये आग, 16 जणांचा मृत्यू; आगीचा व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/25e557ec41bd3016e67e2a49c344075d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनवरील हल्ले अद्यापही सुरुच आहेत. आता पुन्हा एकदा रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेननं म्हटलं आहे की, रशियाने सोमवारी किव्हमधील क्रेमेनचुक मॉलला लक्ष्या केल्याचं म्हटलं आहे. युक्रेनने दावा केला आहे की, रशियनाने क्षेपणास्त्राद्वारे क्रेमेनचुक मॉलच्या इमारतीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 16 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये 59 जण जखमी झाले आहेत. 25 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
युक्रेनच्या आपत्कालीन प्रमुख अधिकारी सर्गेई क्रुक यांनी मंगळवारी सकाळी या दुर्घटनेबाबतची अधिक माहिती दिली आहे. सर्गेई क्रुक यांनी सांगितलं आहे की 'या दुर्घटनेत आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे, 59 लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी 25 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. '
आगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Another act of the russian genocide of the Ukrainian people. This time the ruscists targeted a mall in #Kremenchuk, in the afternoon when it is always especially crowded. The war criminals wanted to kill the civilians, deliberately aiming for the maximum number of casualties. pic.twitter.com/3PbCnjc7PU
— Defence of Ukraine (@DefenceU) June 27, 2022
सोमवारी शॉपिंग सेंटरवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आग विझवणे, मदत कार्य, ढिगारा हटवण्याचं काम सुरु आहे. याआधी 'द कीव्ह इंडिपेंडंट'च्या वृत्तानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी त्यांच्या टेलिग्रामवर लिहिलं की, 'रशियाने क्रेमेनचुकमधील शॉपिंग सेंटरवर क्षेपणास्त्र हल्ला केला. यावेळी एक हजाराहून अधिक लोक मॉलमध्ये होते. मॉलला आग लागली, अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, बळींच्या संख्येची कल्पना करणं अशक्य आहे.'
बळींच्या संख्येची कल्पना करणं अशक्य : झेलेन्स्की
कीव्ह इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरून याबाबत माहिती दिली आहे. 'रशियाने क्रेमेनचुकमधील शॉपिंग सेंटरवर हल्ला केला आहे. या शॉपिंग सेंटरमध्ये एक हजाराहून अधिक लोक होते. या मॉलला आग लागली असून अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, बळींच्या संख्येची कल्पना करणं अशक्य आहे." असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Russia Ukraine War : हजारो लोक असलेल्या मॉलवर रशियाचा हल्ला, बळींच्या संख्येची कल्पना करणे अशक्य : झेलस्की
- Colombia Bullfight : कोलंबियामध्ये बैलांच्या झुंजीदरम्यान स्टेडियमचा स्टँड कोसळला, 4 जणांचा मृत्यू तर 300 हून अधिक जखमी
- Deaths in Trailer : ट्रेलरमध्ये 46 मृतदेह आढळल्याने खळबळ, अमेरिकेच्या टेक्सासमधील घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)