एक्स्प्लोर
Advertisement
कुलभूषण यांच्याकडे फाशीविरोधात अपील करण्यासाठी 60 दिवस : पाकिस्तान
इस्लामाबाद : हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर भारतानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी द्विपक्षीय संबंधांवर याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तानने यानंतर कुलभूषण यांच्याकडे शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी 60 दिवस असल्याचं म्हटलं आहे. येत्या 60 दिवसात ते पुन्हा एकदा शिक्षेविरोधात कार्टात जाऊ शकतात, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत सांगितलं.
कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेचं पालन करण्यात आलं आहे, असा दावाही ख्वाजा असिफ यांनी संसदेत बोलताना केला.
राजनाथ सिंह यांनीही पाकला ठणकावलं
“कुलभूषण जाधव हे इराणमध्ये व्यवसाय करत होते. स्थानिक इराणी नागरिक त्यांचा व्यावसायिक भागीदार होता. व्यवसायानिमित्त ते तेहरानला येत-जात होते. मार्च 2016 मध्ये पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीने कुलभूषण जाधव यांचं अपहरण केलं. त्यानंतर पाक मीडियासमोर त्यांना भारताचे रॉ एजंट म्हणून भासवण्यात आलं. पाक मीडियाला माहिती देताना कुलभूषण जाधवांकडे एक भारतीय पासपोर्ट मिळाला असं सांगण्यात आलं. जर त्यांच्याकडे पासपोर्ट मिळाला तर ते स्पाय कसं असू शकतील.
यावरुन पाकिस्ताचा खोटारडेपणा उघड होतोय. भारतीय दुतावासाकडून सातत्याने पाकिस्तानी दुतावासाशी संपर्क साधून, कुलभूषण जाधव यांना भेटण्याची विनंती करण्यात येत होती. मात्र सातत्याने ती फेटाळून लावण्यात आली.
पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. सर्व नियम, कायदे पायदळी तुडवून जाहीर केलेली फाशी चुकीची आहे. कुलभूषण जाधव यांच्या बचावासाठी काहीही करायला लागलं, तर ते आम्ही करु. कुलभूषण जाधव यांच्याशी न्याय होईल, असं मी आश्वासन देतो”
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं हे सर्वात आधी महत्त्वाचं आहे. मोदी सरकारने आपली सर्व शक्ती पणाला लावून, कुलभूषण जाधव यांना परत आणावं, असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
सुषमा स्वराज यांचा स्पष्ट इशारा
कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे लक्षात ठेवा, असा सज्जड दम स्वराज यांनी भरला आहे. कुलभूषण जाधव यांना लढा देण्यासाठी लागेल ती कायदेशीर मदत केंद्र सरकार करेल, अशी हमी सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली.
आपली बाजू स्पष्ट आहे. कुलभूषण जाधव यांनी कुठलंही गैर कृत्य केल्याचे पुरावे नाहीत, असं स्वराज म्हणाल्या. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात लढताना कुलभूषण जाधव यांना भारतातले उत्तम वकील मिळवून दिले जातीलच, मात्र त्यांना कायदेशीर सहाय्य करण्यासाठी भारत सरकार हरतऱ्हेचे प्रयत्न करेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्वराज यांनी ही माहिती दिली.
हे प्रकरण भारत सरकार उचलून धरेल, असंही सुषमा स्वराज म्हणाल्या. यामुळे हा मुद्दा भारत सरकार संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करण्याचे संकेत मिळत आहेत.
पाकिस्तानच्या उच्चायुक्तांची मुक्ताफळं
कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेविरोधात कार्टात जाता येईल, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी स्पष्ट केलं असलं तरी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी कुलभूषण यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. नवी दिल्लीतील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी कुलभूषण जाधव यांना दहशतवादी संबोधून शिक्षा झालीच पाहिजे, असं म्हटलं आहे. बासित यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या:
सर्व शक्ती पणाला लावा, पण कुलभूषण यांचा जीव वाचवा : ओवेसी
… तर आम्ही ही पूर्वनियोजित हत्या समजू, भारताने पाकला खडसावलं
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा
भारताचा आक्रमक पवित्रा, पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका रद्द
हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक
सर्व शक्ती पणाला लावा, पण कुलभूषण यांचा जीव वाचवा : ओवेसी
गंभीर परिणाम भोगण्यास तयार रहा, सुषमा स्वराज यांचा इशारा
कुलभूषण जाधवांना सोडवण्यासाठी शक्य ते सर्व करु : राजनाथ सिंह
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement