एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक ब्रिटनचे नवे अर्थमंत्री
साजिद जावीद यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे सुनाक यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे ट्रेजरी मुख्य सचिव पदाची जबाबदारी आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कॅबिनेटमध्ये केलेल्या बदलापैकी हा एक मोठा बदल मानला जात आहे.
लंडन : इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. अर्थमंत्री साजिद जेवीद यांनी राजीनामा दिल्यानंतर सुनाक यांची नियुक्ती झाली आहे. सुनाक यांच्या नियुक्तीची माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून माहिती देण्यात आली आहे.
साजिद जावीद यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे सुनाक यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे ट्रेजरी मुख्य सचिव पदाची जबाबदारी आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कॅबिनेटमध्ये केलेल्या बदलापैकी हा एक मोठा बदल मानला जात आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले, महाराणी (एलिजाबेथ द्वितीय) ऋषी सुनक यांच्या वित्तमंत्रीपदाच्या निवडीमुळे आनंदी आहे.
सुनक यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी तत्वज्ञान, राजकीय अर्थशास्त्र आणि एमबीएचे शिक्षण घेतले आहे. ऋषी हे 2015 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडूण आले होते. यानंतर 2018 मध्ये त्यांची प्रथम स्थानिक सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. नंतर, मागील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये त्यांच्याकडे ट्रेजरीच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
माजी पंतप्रधान थेरेसा मे यांच्या तीन वेळा झालेल्या ब्रेक्सिट करारास सुनको यांनी समर्थन दिले होते. ते जॉन्सनच्या सुरुवातीच्या समर्थकांपैकी एक आहे. राजकारणात येण्यापूर्वी सनक एक यशस्वी उद्योजकही होते. छोट्या यूके कंपन्यांना वित्तपुरवठा करणार्या एक अब्ज डॉलर्सच्या कंपनीचे ते सह-संस्थापक होते. सुनक हे ब्रेक्झिटचा मोठे समर्थक आहे. त्यांना असा विश्वास आहे की, ब्रेक्झिटमुळे ब्रिटनच्या छोट्या व्यावसायिकांना मदत मिळेल.
सुनक यांची नारायण मूर्तींच्या मुलीशी म्हणजे अक्षता मूर्तीशी भेट कॅलिफोर्निया येथे झाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केले. या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळातील फेरबदलात भारतीय वंशाचे खासदार आलोक शर्मा यांना व्यापार, ऊर्जा आणि औद्योगिक रणनीती मंत्री आणि सुएला ब्रेव्हरमॅन यांची अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सैन्यदलातील जवानानं उभारलं संग्रहालय, देशसेवेसोबत जपला भारतीय संस्कृतीचा वसा | सातारा | स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement