एक्स्प्लोर

तरुणांची माथी भडकवणारा झाकीर नाईक मलेशियात सापडला?

मलेशिया सरकारने झाकीर नाईकला भारताच्या ताब्यात सोपवल्याचं सांगण्यात येत आहे. त्याला आज रात्रीपर्यंत मुंबईत आणलं जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक भारताच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. झाकीर नाईकला मलेशियात पकडलं आहे. मलेशिया सरकारने झाकीर नाईकला भारताच्या ताब्यात सोपवल्याचं सांगण्यात येत आहे. त्याला आज रात्रीपर्यंत मुंबईत आणलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत सरकार झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील होते. अखेर त्यामध्ये यश आलं आहे. आयसीसीस या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करणे, धार्मिक भावना भडकावणे आणि मुलांचे ब्रेनवॉश करुन कट्टरता पसरवणे हे आरोप इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा सर्वेसर्वा झाकीर नाईकवर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने याबाबतचं वृत्त फेटाळलं आहे. झाकीर नाईक 2016 पासून भारतातून फरार आहे. अरब देशांमध्ये भागमभाग केल्यानंतर तो अनेक महिन्यांपासून मलेशियात होता. इतकंच नाही तर त्याने मलेशिया सरकारला नागरिकत्त्वासाठी निवेदनही दिलं होतं. मात्र मलेशियातील नजीब रज्जाक सरकार कोसळल्यानंतर, नव्या सरकारने तिथले नियम बदलले आणि झाकीर नाईक भारताच्या ताब्यात आला. मी भारतात येणार नाही- झाकीर नाईक दरम्यान, झाकीर नाईकने आपण भारतात येणार असल्याचं वृत्त फेटाळलं आहे.  "मी भारतात येणार असल्याचं वृत्त खोटं आणि बिनबुडाचं आहे. योग्य न्यायाच्या दृष्टीने जोपर्यंत मी स्वत:ला सुरक्षित मानत नाही, तोपर्यंत मी भारतात परतणार नाही.  सरकारकडून योग्य न्यायाबाबतचे संकेत मिळाल्यास मी नक्की मायदेशी परतेन", असं  झाकीर नाईकने म्हटलं आहे. झाकीर नाईकवरील आरोप 52 वर्षीय झाकीर नाईकवर तरुणांना दहशतवादी कारवायांना प्रवृत्त करणं, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं, प्रक्षोभक भाषण करणं, असे आरोप आहेत. याशिवाय ईडीनेही त्याच्यावर बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी पीएमएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  परदेशातून फंड गोळा करुन तो दहशतवादी कारवायांसाठी वापरण्याचा आरोप आहे. झाकीर नाईकच्या प्रवचनांमुळेच मुंबईतील चार तरुण आयसीसमध्ये सहभागी झाल्याचा आरोप आहे. झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवर आधी बांगलादेशने मग भारताने बंदी घातली आहे. बांगलादेशात दोन वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटातील अतिरेकी झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रवृत्त झाला होता. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. तर इंग्लंड, कॅनडा आणि मलेशियासह पाच देशांनीही त्याच्यावर बंदी घातली आहे. एनआयएने त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. संबंधित बातम्या  मुंबई : झाकीर नाईकच्या याचिकेवर हायकोर्टाचा संताप   अलीगढच्या इस्लामिक स्कूलमधील पाठ्यपुस्तकात झाकिर नाईक ‘हिरो’ 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावाBajrang Sonawane on Walmik Karad| वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता- बजरंग सोनावणेएबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 4PM TOP Headlines 4PM 02 January 2025ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 02 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Dhule Crime News : मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
Embed widget