(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AstraZeneca लसीचा वापर सुरू ठेवा, लस पूर्णपणे सुरक्षित; WHO ची शिफारस
Astrazeneca Vaccine: Astrazeneca लसीच्या वापरामुळे काही जाणांनी रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे काही देशांनी या लसीच्या वापरावर बंदी आणली होती.
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनी बुधवारी जगभरातील देशांना अॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) लस वापरणे सुरू ठेवण्याची शिफारस केली. लसीबाबत अनेक देशांनी नागरिकांमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर लसीच्या वापरावर स्थगिती आणली होती. त्यानंतर लसीच्या सुरक्षेकडेही लक्ष देत आहोत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं.
लस पूर्णपणे सुरक्षित
डब्ल्यूएचओ, युरोपचे ड्रग रेग्युलेटर आणि अॅस्ट्रॅजेनेका यांनी स्वतः ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पुन्हा सांगितले आहे. या लसीच्या वापरामुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. डब्ल्यूएचओने देखील अॅस्ट्रॅजेनेकाला क्लीन चिट देत म्हटलं की, लस आणि रक्ताच्या गुठळ्या याचा कोणताही संबंध असलेली एकही केस आढळली नाही. फ्रान्स, स्पेन, इटली आणि जर्मनीने अॅस्ट्रॅजेनेका लस वापरण्यास मनाई केली. या देशांनी असं म्हटले आहे की, लोकांनी लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची तक्रार केली आहे.
Coronavirus : आतापर्यंत 3.64 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण, गेल्या 24 तासात 14 लाख लोकांना मिळाली लस
संयुक्त राष्ट्रच्या हेल्थ एजन्सीने एका निवेदनात म्हटलं आहे की, "डब्ल्यूएचओ ग्लोबल अॅडव्हायझरी कमिटी ऑन वॅक्सिन सेफ्टी सुरक्षेच्या दृष्टीने सावधपूर्वक मूल्यांकन करत आहे. डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे की, अॅस्ट्रॅजेनेका लसीचा वापर सुरु ठेवला पाहिजे. मंगळवारी युरोपियन मेडिसीन एजन्सीने देखील देशांना ही लस वापरणे सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. रक्ताच्या गुठळ्या होण्याचा लसीशी काहीह संबंध नाही.
फ्रान्सपासून व्हेनेझुएला आणि इंडोनेशियातील अनेक देशांनी असे सांगितले आहे की, लस घेतलेल्या लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या आणि मेंदूच्या रक्तस्त्रावाच्या अनेक प्रकरणांनंतर या लसीचा वापर करणार नाही. त्याच वेळी, तज्ञांनी असे म्हटले आहे की, या क्षणी लस ब्लड कॉटिंगशी संबंधित नसावी. युरोपियन युनियन देश आणि ब्रिटनमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी कोविड 19 लसीचे डोस घेतले आहेत. त्यापैकी फक्त 40 केसेसमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत.