एक्स्प्लोर

Omar Laden Interview: माझ्या वडिलांनी कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांची चाचणी केलेली; ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खळबळजनक खुलासा

Al-Qaeda Chief Osama Bin Laden Son Interview: लादेनचा मुलगा ओमर यानं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

Al-Qaeda Chief Osama Bin Laden Son Interview: अल कायदाचा ठार झालेला प्रमुख ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) बाबत एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा खुलासा कोणत्याही रिपोर्टमधून झालेला नाही. हा खुलासा खुद्द ओसामा बिन लादेनच्या मुलानं केला आहे. ओसामा बिन लादेनच्या मुलानं असा दावा केलाय की, त्याचे वडील तो लहान असताना त्याला अनेक गोष्टींचं प्रशिक्षण द्यायचे. त्यावेळी तो खूपच लहान होता, त्यावेळी लादेननं त्याला बंदूक चालवायला शिकवलं होतं. एवढंच नाहीतर, त्याच्या कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांंचं परीक्षणही केलं होतं. 

लादेनचा मुलगा ओमरने कतार दौऱ्यावर असताना 'द सन' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे खळबळजनक खुलासे केले आहेत. तो म्हणाला की, "तो पीडित आहे आणि त्याच्या वडिलांसोबत घालवलेला वाईट काळ विसरण्याचा प्रयत्न करतोय."

9/11 हल्ल्यापूर्वी अफगाणिस्तान सोडलं

व्यवसायानं चित्रकार असलेला 41 वर्षीय ओमर आता पत्नी जैनासोबत फ्रान्समध्ये राहतो. ओमरनं मुलाखतीत पुढे बोलताना सांगितलं की, "ओसामा बिन लादेननं त्याला सांगितलं होतं की, त्याचं (लादेनचं) काम पुढे नेण्यासाठी त्यानं ओमरची निवड केली आहे. परंतु न्यूयॉर्कमध्ये 11 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही महिन्यांपूर्वी, म्हणजेच, 2001 एप्रिलमध्ये ओमरनं अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि असं करण्यात तो यशस्वीही झाला.  

वाईट काळ विसरण्याचा प्रयत्न करतोय : ओमर 

आपल्या कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांच्या चाचणीचा संदर्भ देताना ओमर म्हणाला की, "त्यांनी (लादेनच्या गुंडांनी) माझ्या कुत्र्यांवर हा प्रयोग केला. मला यामुळे खूपच दुःख झालं होतं. मी तो वाईट काळ विसरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतोय. हे खूप कठीण आहे. मला तो काळ आठवला की, खूप त्रास होता. 

11 सप्टेंबरला काय झालं?

11 सप्टेंबर 2001 चा दिवस केवळ अमेरिकेसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी दहशतीनं भरलेला होता. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यानं जगातील महासत्ता म्हणून ओळखला जाणारी अमेरिका हादरली होती. 11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदा या दहशतवादी संघटनेनं अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दोन विमानांद्वारे हल्ला करून दहशत पसरवली. सकाळी 8.30 च्या सुमारास अवघ्या 45 मिनिटांत 110 मजली वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या होत्या.

कोण होता ओसामा बिन लादेन? 

1957 मध्ये सौदी अरेबियामध्ये जन्मलेला बिन लादेन हा अब्जाधीश उद्योगपती मोहम्मद बिन लादेन यांचा मुलगा. त्याच्या वडिलांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. या विमान अपघातासाठी एका अमेरिकन पायलटला जबाबदार धरण्यात आलं होतं. वडिलांच्या मृत्यूच्या वेळी ओसामा तरुण होता. वयाच्या 17 व्या वर्षी ओसामानं पहिल्यांदा एका सीरियन मुलीशी लग्न केलं, जी त्याच्या नात्यातीलच होती. त्यानंतर त्यांनं एकूण पाच लग्नं केली असून त्याला एकूण 23 मुलं असल्याचं सांगितलं जातं.

1979 मध्ये अफगाणिस्तानवर सोव्हिएत आक्रमणानंतर ओसामा पाकिस्तानात गेला. पण त्याआधी त्यानं रशियन सैन्याविरुद्धच्या मोहिमेसाठी भरपूर पैसा गोळा केला. अमेरिकन लेखक स्टीव्ह कोल यांच्या 'द बिन लादेन्स' या पुस्तकातील संदर्भानुसार ओसामाचा सावत्र भाऊ सालेमचाही 1988 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनांनी तो पुरता संतापला होता. 

1990 च्या इराक-कुवैत युद्धादरम्यान ओसामा बिन लादेननं सौदी अरेबियामध्ये अमेरिकन सैन्याच्या उपस्थितीला विरोध केला होता. मुस्लीम देश अमेरिकेनं पसरवलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा बळी पडत असल्याचं ओसामाचं मत होतं. त्यानं अमेरिकेविरुद्ध जिहादची घोषणा केली. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर त्यानं जगभरात दहशतवादी हल्ले केले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Mahayuti : महायुतीत उमेदवारांचे गूढ, महायुतीचे उमेदवार अजूनही ठरेना!Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाNarendra Modi Wardha Speech : तडस - राणांसाठी नरेंद्र मोदींची सभा! वर्ध्यात घोषणांचा पाऊसMadha Lok Sabha : भाजपला माढ्यात मोठा धक्का! मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Embed widget