TOP 70 At 7AM 24 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
TOP 70 At 7AM 24 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
सैफ हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर, आरोपीच्या बोटांचे ठसे सैफच्या घरी सापडलेल्या बोटांच्या ठशांशी जुळतात, फॉरेन्सिक तपासणीत उघड, तर सैफच्या वैद्यकीय अहवालानुसार आरोपीवर बीएनएसचे कलम १०९ लावता येणार नाही.
दावोसमध्ये महाराष्ट्राचे यंदा रेकॉर्डब्रेक करार...महाराष्ट्रात होणार तब्बल १६ लाख कोटींची गुंतवणूक...दावोस परिषदेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती...
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे ६७ रुग्ण, १३ जण व्हेंटिलेटरवर, सर्वाधिक रुग्ण असलेल्या परिसराचं सर्वेक्षण केल्याची महापालिका अधिकाऱ्यांची माहिती
अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, अमेरिकेत जन्मलेल्या बाळाचे नागरिकत्व रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती, ट्रम्प यांचा आदेश घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा
स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईची जम्मू काश्मीरसमोर दाणादाण... रोहित, जैसवाल, अय्यर, रहाणे, दुबे सपशेल फ्लॉप, मुंबई १२० धावात ऑल आऊट ((पहिल्या दिवसअखेर जम्मू ७ बाद १७४))