Pushpa 2 Box Office Collection Day 50: 'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक; रिलीजच्या 50व्या दिवशीही पुष्पाभाऊनं भल्याभल्यांना रडवलं, कमाई किती?
Pushpa 2 Box Office Collection: 'पुष्पा 2: द रुल' नं थिएटरमध्ये धमाल करून 50 दिवस पूर्ण केले आहेत. यासह, या चित्रपटानं आपल्या नावावर एक नवा विक्रमही केला आहे.
Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुन (Allu Arjun), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा 2'नं (Pushpa 2) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुरळा उडवून दिला आहे. अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट 'पुष्पा 2' नं 50 दिवसांचा प्रवास पूर्ण केला आहे. या चित्रपटानं 50 दिवसांत निर्माण केलेली संवेदना कौतुकास्पद आहे. या चित्रपटानं देशातील सर्व ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकलं आहे आणि कमीत कमी वेळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. दुसरीकडे, राम चरणचा 'गेम चेंजर' स्लो मोशनमध्ये कमाई करत आहे.
दिग्दर्शक सुकुमार यांनी 'पुष्पा 2: द रुल'चे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन 50 दिवस झाले आहेत. या काळात, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आणि दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्व चित्रपटांना मागे टाकले. 'पुष्पा 2: द रूल' हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. रिलीज होऊन 50 दिवस उलटले तरी, त्याची कमाईची गती कमी झालेली नाही. या चित्रपटानं रिलीजच्या 50 व्या दिवशी अनेकांना पाणी पाजलं आहे.
View this post on Instagram
पण, 50 दिवसांनी 'पुष्पा 2'ची कमाई आता चित्रपटगृहांमध्ये घटताना दिसत आहे. 'बाहुबली 2' सारखे चित्रपट 10 आठवडे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आणि जर 'पुष्पा 2' देखील तेवढाच काळ थिएटरमध्ये राहिला तर ते नक्कीच 'बाहुबली 2' चा टप्पा ओलांडेल.
'पुष्पा 2'ची 50व्या दिवशी 50 लाखांची कमाई
sacnilk च्या रिपोर्टनुसार, या फिल्मनं 50व्या दिवशी 50 लाखांची कमाई केली आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर फिल्मनं आतापर्यंत 1230.55 चं कलेक्शन केलं आहे. या फिल्मनं सर्वाधिक कलेक्शन हिंदीमध्ये केलं आहे.
'पुष्पा 2'चं वर्ल्डवाइड कलेक्शन
वर्ल्डवाईल्ड कलेक्शनवर नजर टाकली तर, फिल्मनं 1737 कोटींचा आकडा गाठला आहे. यासोबतच 2024च्या हिट फिल्म्सपैकी एक बनली आहे. 'पुष्पा 2'नं फक्त देशातच नाहीतर, परदेशातही आपला ठसा उमटवला आहे. या फिल्मनं परदेशात जवळपास 271 कोटींचं कलेक्शन केलं आहे.