![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Viral Video : फूड आर्टिस्टने केले सर्वांनाच थक्क, चक्क खऱ्या फुलासारखाच बनवला केक, पाहा हा व्हिडीओ
Viral Video : सध्या एका फूड आर्टिस्टने बनवलेला केक सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये ही व्यक्ती खऱ्या फुलासारखा केक बनवताना दिसत आहे.
![Viral Video : फूड आर्टिस्टने केले सर्वांनाच थक्क, चक्क खऱ्या फुलासारखाच बनवला केक, पाहा हा व्हिडीओ Viral Video food artist showed flair on cake made desert like a real flower Viral Video : फूड आर्टिस्टने केले सर्वांनाच थक्क, चक्क खऱ्या फुलासारखाच बनवला केक, पाहा हा व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/43a22dc8cec6884b2b11f3c473580522_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Viral Video : आजकाल सोशल मीडिया हे जगभरातील कलाकार आणि कलागुणांना ओळख देण्यासाठी एक व्यासपीठ बनले आहे. पूर्वी लोकांना त्यांची कला आणि कौशल्ये सादर करण्यासाठी फार पैसे मोजावे लागत असत. परंतु, आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ हे काम अगदी सहज सोपे झाले आहे.
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक फूड आर्टिस्ट एक अप्रतिम केक बनवताना दिसत आहे. या केककडे पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. व्हिडिओमध्ये हा आर्टिस्ट केकचे डिझाईन अशा काही प्रकारे करताना दिसतोय की ते नक्की कमळ आहे की केक हे ओळखणं कठीण झालं आहे.
पाहा हा व्हिडीओ :
View this post on Instagram
फूडप्रेमींनी सोशल मीडियावर या व्हिडीओला खूप पसंती दाखवली आहे. या व्हिडीओमधील आर्टिस्ट केकचं इतकं बारकाईने वर्णन करतोय की कोणालाही आश्चर्यच वाटेल. व्हिडीओच्या शेवटी आर्टिस्टने केक कापून खाऊन दाखवला. जे पाहून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले. तसेच, कमेंट्समध्ये अनेकांनी हा केक खाण्याची इच्छा व्यक्त केली. आतापर्यंत या व्हिडीओला 13 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत. केक बनवणाऱ्या आर्टिस्टचे मोठ्या संख्येने यूजर्स कौतुक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- हरवलेला कुत्रा शोधून देणाऱ्यासाठी 50 हजारांचे बक्षीस; चंद्रपूरच्या श्वानप्रेमीचं आवाहन चर्चेत
- Viral Video : हँडलवर उभं राहून चालवली सायकल; तोल सांभाळताना पाहून व्हाल थक्क, डोळ्यावर विश्वास बसणार नाही
-
Viral Video : मोराच्या अंड्याची चोरी करणं पडलं महाग, पुढे असं काही घडलं की...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)