एक्स्प्लोर

हरवलेला कुत्रा शोधून देणाऱ्यासाठी 50 हजारांचे बक्षीस; चंद्रपूरच्या श्वानप्रेमीचं आवाहन चर्चेत

Chandrapur News : हरवलेल्या कुत्र्याला शोधून देण्यासाठी मालकाने बक्षीस जाहीर केलं आहे. तेही एक-दोन हजार नाही तर तब्बल 50 हजार इतकं. 'जोरू' असे या कुत्र्याचे नाव आहे. याची चर्चा सध्या चंद्रपुरात सुरुय.

Chandrapur News Updates : आपल्या घरातील एखादा सदस्य हरवला किंवा घर सोडून गेला तर त्यासाठी घरातील व्यक्ती कासावीस होऊन त्याचा शोध घेतात. नाही मिळाला तर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊन वर्तमानपत्रात जाहिरात देतात. त्यातही समाधान झाले नाही तर त्या व्यक्तीला शोधून देणाऱ्या व्यक्तीसाठी बक्षिस जाहीर करतात. ही बाब सामान्य आणि अपेक्षित अशीच आहे. मात्र हे सगळं एखादा पाळीव प्राण्यासाठी होत असेल तर? तर अशी घटना दुर्मिळच म्हणावी लागेल. मात्र अशीच एक घटना चंद्रपूर शहरात घडली असून याची चंद्रपूर शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
 
एका हरवलेल्या कुत्र्याला शोधून देण्यासाठी त्याच्या मालकाने थेट बक्षीस जाहीर केलं आहे. तेही एक-दोन हजार नाही तर तब्बल 50 हजार इतकं. 'जोरू' असे या कुत्र्याचे नाव असून डॉ. दिलीप कांबळे असे त्याच्या मालकाचे नाव आहे.डॉ. दिलीप कांबळे हे मूळचे नागपुरचे असून त्यांचे रामाळा तलाव मार्गावर सिटी स्कॅन, एमआरआय सेंटर आहे. तिथेच त्यांचे निवासस्थान देखील आहे. त्यांच्यासोबत त्यांचा जोरू नावाचा कुत्रा होता. अगदी एक महिन्याचा असताना त्याला डॉ. कांबळे यांनी विकत घेतले. लाब्राडोर क्रॉस जातीचा असलेल्या या कुत्र्याचा सांभाळ कांबळे कुटुंबीयांनी अतिशय प्रेमाने केला. तेव्हापासूनचा तो घरचा एक सदस्य झाला. त्याला काय हवं, काय नको याची काळजी कांबळे कुटुंब घेत होते.
 
24 फेब्रुवारीच्या सकाळी जोरुला कांबळे कुटुंबीयांनी फिरण्यासाठी बाहेर सोडले होते. घराच्या आजूबाजूला फिरल्यावर एक-दीड तास झाला की तो परत आपल्या घरी यायचा. मात्र त्यादिवशी जोरू परत आलाच नाही. डॉ. कांबळे यांनी त्याची खूप शोधाशोध केली. मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. जोरू हा अतिशय मनमिळावू असल्यामुळे तो कुणाकडेही सहज जायचा. याचाच गैरफायदा कोणीतरी घेतला असावा आणि त्याला चोरून नेले असावे असा संशय डॉ. कांबळे यांना आहे.
 
जोरू गायब झाल्यावर त्याला शोधण्यासाठी डॉ. कांबळे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. मात्र तो मिळाला नाही. महापालिकेच्या डॉग स्नॅचर पथकाने तर हा कुत्रा नेला नसावा याचीही शहानिशा केली. त्यामुळे जोरुचा फोटो टाकून त्याची माहिती देणाऱ्यास तब्बल 50 हजारांचे बक्षीस जाहीर करून सोशल मीडियावर ही पोस्ट टाकली मात्र तरीही त्याची माहिती मिळाली नाही. आता जोरुचे पॉम्प्लेट छापून ते शहरातील अनेक ठिकाणी चिटकविण्यात आले आहेत. तसेच स्थानिक वर्तमानपत्रात देखील त्यांनी याची जाहिरात दिली आहे. एवढेच नव्हे तर एखाद्या चोरट्याने या कुत्र्याला कुणाला विकले असेल तर ज्याने त्याला ज्या किंमतीत विकत घेतले त्यापेक्षा तीन पटीने पैसे देण्याची तयारी डॉ. कांबळे यांनी दर्शवली आहे.
 
डॉ. कांबळे यांची मुलगी कांशी हिला जोरुचा फार लळा लागला होता. आठ वर्षीय कांशी त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती. दिवसरात्र ती त्याच्या सोबत खेळत असायची. मात्र जोरू गायब झाल्याचे तिला कमालीचे दुःख झाले. जोरूला परत आणा नाहीतर मी जेवणार नाही असा तगादा तिने लावलाय. तब्बल सात दिवस ती काही खायला प्यायला तयार नव्हती. तिची समजूत काढली तरी ती मानायला तयार नव्हती. दररोज ती जोरूचाच तगादा लावत असते, असे डॉ. कांबळे सांगतात. आमच्या घरातील एक सदस्य हरवला आहे असेच आम्हाला वाटत आहे असे कांबळे म्हणतात. पाळीव प्राण्याचाही माणसाला इतका लळा असतो याचे दुर्मिळ उदाहरण डॉ. कांबळे यांच्या प्रसंगातून दिसून येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Embed widget