Maha Kumbh 2025 : तीन हजार कोटींची संपत्ती अन् अलिशान जीवन सोडलं, भोगाचा त्याग करून भगवं धारण केलं; महाकुंभमध्ये बिझनेस बाबा व्हायरल
Mahakumbh Viral Business Baba : महाकुंभमध्ये व्हायरल होत असलेल्या बिझनेस बाबाने त्याची 3000 कोटींची संपत्ती त्याग केली आहे. त्याने आता वैराग्य धारण केलं आहे.

Mahakumbh Viral Business Baba : आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना श्रीमंत व्हायचं आहे. त्यासाठी ते जीव तोडून मेहनत करतात, स्वतःसाठीही वेळ काढत नाहीत. काही वेळाने ते श्रीमंत होतातही. पण नंतर हरवलेल्या समाधानाच्या शोधात मग सर्वाचा त्याग करून वैराग्य धारण करतात. कुंभमेळ्यामध्ये असाच एक बाबा सध्या व्हायरल होत आहे. त्या बाबाने त्याच्या 3000 कोटींची संपत्ती त्याग केली आहे आणि भगवं वस्त्र धारण करून शांती-समाधानाच्या शोधात निघाला.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. 13 जानेवारीपासून सुरू झालेला हा महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या महाकुंभासाठी देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येत आहेत. याशिवाय असे अनेक साधूबाबा या महाकुंभात पाहायला मिळाले आहेत जे आतापर्यंत लोकांच्या नजरेपासून दूर होते. आपण IIT मधील बाबांबद्दल बोलत आहोत किंवा राजदूत बाबा किंवा लिलीपुट बाबा किंवा रुद्राक्ष बाबा.
याशिवाय हर्षा ही मॉडेल साध्वी बनूनही खूप चर्चेत राहिली. या महाकुंभात या ऋषी-बाबांनीही लोकांची उत्सुकता वाढवली आहे. आता आणखी एक बाबा व्हायरल होत आहे. त्याचे नाव आहे बिझनेस बाबा. हे व्हायरल होण्याचे कारण म्हणजे बाबाने हजारो कोटींची संपत्ती मागे सोडली.
महाकुंभमध्ये बिझनेस बाबा व्हायरल
प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभमध्ये अनेक बाबा आणि साधू एकामागून एक व्हायरल होताना दिसत आहेत. आता या यादीत बिझनेस बाबा दाखल झाले आहेत. हा बिझनेस बाबा इतर बाबांपेक्षा वेगळा आहे. कारण त्याने आपले 3000 कोटी रुपयांची संपत्ती, अलिशान जीवन सोडून वैराग्य धारण केलं. बिझनेस बाबाची कहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
बाबांनी सांगितले की, "सुख-सुविधांनी भरलेले जीवन जगल्यानंतर त्यांना समजले की भरपूर संपत्तीही माणसाला समाधान देऊ शकत नाही आणि त्यानंतर त्यांनी भगवे कपडे घालून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. बिझनेस बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @daily_over_dose नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

