एक्स्प्लोर

Barshi Fire: बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, चार महिला कामगारांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये (Solapur Barshi Pangri Fire News) फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Solapur Barshi Fire : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये (Solapur Barshi Pangri Fire News) फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. यात अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.  बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडली आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला.  या घटनेतील मृतांचा आकडा मोठा असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

 बार्शीतल्या पांगरी येथील फटाका कारखान्याला लागलेल्या आगीत चार महिला कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.  जवळपास नऊ जण जखमी असून सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. मृतांमध्ये गंगाबाई मारुती सांगळे, रा. उक्कडगाव, मीना बाबासाहेब मगर, सुमन ज्ञानोबा जाधवर, मोनिका संतोष भालेराव यांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत शासनाकडून घोषित कऱण्यात आली आहे.

फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास 40 कर्मचारी काम करत होते अशी प्राथमिक माहिती होती.  अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. ही घटना पांगरी शिराळा रस्त्यावर असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात घडली. घटनेनंतर मोठा आवाज परिसरात झाला. तसेच धुराचे आणि आगीचे लोट परिसरात दिसून येत होते. 

बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ रविवारी दुपारी चारच्या सुमारास भीषण घटना घडली. ही फटाक्याची फॅक्टरी गेल्या दहा वर्षांपासून सुरु आहे. या फॅक्टरीत आजूबाजूच्या गावातील कामगार कामासाठी येत होते. आज चार वाजेच्या सुमारास फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना झाला भीषण स्फोट झाला. यात काही कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे तर गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.  

जखमींना तातडीने पांगरी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच बार्शीतील दवाखान्यांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.  घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भीषण घटना घडल्याने बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच राज्यात नाशिकमधील इगतपुरी आणि सोलापुरातील बार्शीतील या दोन्ही घटनांमध्ये काही कामगारांना जीव गमावावा लागला आहे. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते भीषण आहेत. 

ही बातमी देखील वाचा

Solapur Barshi Fire : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, अनेक कामगार जखमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सJalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget