एक्स्प्लोर

ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा

तासगाव-सांगली रोडवरील कुमठेफाटा येथे ओव्हरटेक करीत असताना वडापने समोरून येणार्‍या दुचाकीला उडविल्याची घटना घडली.

सांगली : अपघाताच्या घटना सातत्याने घडत असून ओव्हरटेक करण्याच्या नादातच महामार्गावर अपघात होताना पाहायला मिळते. आता, शहरातील कुमठेफाटा जवळ भीषण अपघाताची घटना घडली असून आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एकजण गंभीर जखमी असून अपघातानंतर (Accident) स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आईसह 2 मुलांचं मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ओव्हरटेक करीत असताना वडापने दुचाकीला उडविल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघातामध्ये दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

तासगाव-सांगली रोडवरील कुमठेफाटा येथे ओव्हरटेक करीत असताना वडापने समोरून येणार्‍या दुचाकीला उडविल्याने आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर, सबंधित महिलेचा पती मात्र गंभीर जखमी असून त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीवरील दाम्पत्य आपल्या मुलांसह सांगलीहून आटपाडीकडे निघाले होते. ते कुमठेफाटा येथे आले असता वळणावर भरधाव वेगाने तासगावकडून येणार्‍या वडापने ओव्हरटेक करीत असताना समोरून येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत. त्यामुळे या भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून महिलेच्या पतीवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने तीन जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे.

वर्ध्यातही अपघातात महिलेचा मृत्यू

वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील नागपूर-हैदराबाद मार्गावरील शेडगाव चौरस्त्यावर नागपूरकडुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने महिलेस धडक दिली. या अपघातात  ट्रॅव्हलसच्या समोरील चाकात येऊन महिला जागीच ठार झाली आहे. महिलेचा अपघातात मृत्यू झाल्याने येथे काही काळ तणावाचे वातावरण होते. नागरिक संतप्त झाल्याने वाहतूक खोळबल्याचं पाहायला मिळालं. हळदगाव येथील 55 वर्षीय सुधाबाई माणिक झाडे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. येथील बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या कामावर सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असणाऱ्या पतीचा जेवणाचा डब्बा घेऊन सदर महिला ही येथे आली असता त्यांचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

हेही वाचा

परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांना दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांना दिली ऑफर, कितीला विकत घेता?
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांना दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांना दिली ऑफर, कितीला विकत घेता?
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
Gold Silver Rate : सोने 1175 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 5835 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 22 कॅरेट,24 कॅरेट सोन्याचे दर 
सोने 1175 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 5835 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 22 कॅरेट,24 कॅरेट सोन्याचे दर 
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
Nagpur Accident News: रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
Embed widget