एक्स्प्लोर

Fake Currency in Sangli: सांगलीत 50 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, शंभराची एक नोट 70 रुपयांना; 40 लाखांची करन्सी बाजारपेठेत

Maharashtra Crime News: बनावट नोटा प्रकरणी अटकेत असलेल्या मिरज मधील अहदने तब्बल ४० लाखाच्या बनावट नोटा चलनामध्ये आणल्या. सांगली पोलिसांच्या तपासात माहिती उघड. अहदकडून प्रिंटर, लॅपटॉप जप्त

सांगली: बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांच्या अटकेत असलेल्या मिरज मधील अहद शेखने तब्बल 40 लाखांच्या बनावट नोटा चलनामध्ये आणल्याची धक्कादायक माहिती सांगली पोलिसांच्या (Sangli Police) तपासात समोर आली आहे. 50 रुपयांच्या हुबेहूब भारतीय चलनी नोटाप्रमाणे बनावट नोटा बनवणाऱ्या मिरजेतील अहद महंमद अली शेख (वय 44, रा. शनिवार पेठ, मिरज) याला पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली होती. अहदकडे (Ahad Shaikh) केलेल्या चौकशीत त्याने आज अखेर सुमारे 40 लाखांच्या बनावट नोटा (Fake Currency) चलनात आणल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. तसेच अहदकडून सव्वा दोन लाखांचा प्रिंटर, लॅपटॉप जप्त केला आहे. त्याच्याकडून नोटा घेणाऱ्या एजंटाचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. 

गेल्या आठवड्यात सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणचे पथक बनावट नोटा विक्रीसाठी आला असताना अहदला सापळा रचून  ताब्यात घेतले होते. त्याच्या झडतीमध्ये 50 रुपयांच्या बनावट 75 नोटा आढळल्या. त्यांची कसून चौकशी केली असता मिरजेत त्याचा बनावट नोटा तयार करण्याचा छापखानाच सुरू केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी तेथे छापा टाकला. 50 रुपयांच्या एक लाख ९० हजारांच्या बनावट नोटा, स्कॅनर, प्रिंटर, कटिंग मशीन, नोटा छापण्याचा कागद (Note printing Machine), शाई, प्रिंटिंग मशीन, कागदांची बंडले असा एकूण 3 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अहद शेख याला तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात त्याने जवळपास एक वर्षापासून बनावट नोटा (Fake Notes) छापण्यास सुरुवात केली होती अशी माहिती दिलीय. 

आतापर्यंत 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती पुढे आली. अहदच्या या कारनाम्यामागे आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय. 70 रुपयाला बनावट शंभर रुपये तो देत असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून आता संबंधित एजंटचा शोधही घेतला जात आहे. मात्र, या बातमीने सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यात आता नेमक्या किती बनावट नोटा फिरत असाव्यात, याबाबत तपास सुरु आहे. 

आणखी वाचा

युट्यूबवर पाहून घरातच छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी नापास 26 वर्षीय तरुणाला बेड्या

40 हजारात एक लाखांच्या बनावट नोटा; 500च्या दोन नोटा अन् बाकी वह्यांचं बंडल; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटांच्या छापखान्याचा भांडाफोड

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
NCP Sangli News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
Sangli NCP: सांगलीमध्ये राष्ट्रवादीत 'स्वीकृत'वरून राडा! गटनेत्यांनी पद विकल्याचा ज्येष्ठ नेत्याचा खळबळजनक आरोप, थेट सुनेत्रा पवारांकडे तक्रार करणार, नेमकं काय घडलं?
सांगलीमध्ये राष्ट्रवादीत 'स्वीकृत'वरून राडा! गटनेत्यांनी पद विकल्याचा ज्येष्ठ नेत्याचा खळबळजनक आरोप, थेट सुनेत्रा पवारांकडे तक्रार करणार, नेमकं काय घडलं?
मुलगी पळवून नेल्याचा आरोप, 8 दिवस जेलमध्ये होतो, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला मजेशीर किस्सा 
मुलगी पळवून नेल्याचा आरोप, 8 दिवस जेलमध्ये होतो, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला मजेशीर किस्सा 

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Video Viral : महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
Maharashtra Weather Updates मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Dhurandhar 2 vs Vaazha 2: ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Embed widget