(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | शिरूरमध्ये क्वॉरंटाईन असलेल्या तब्लिग जमातच्या 10 सदस्यांचे पलायन
शिरूरमध्ये तब्लिग जमातच्या 10 सदस्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. या दहाजणांनी तिथून पलायन केलं आहे. मात्र, या दहाजणांचा दिल्लीतील निजामुद्दीच्या मर्कजमधील कार्यक्रमाशी संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
पुणे : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. दिल्लीतील निजामुद्दीच्या मर्कजमध्ये मार्च महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तोच कार्यक्रम देशात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा प्रमुख स्रोत असल्याचं दावा केलाय जातोय. याच कार्यक्रमावरुन आलेल्या 10 जणांना पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरात क्वॉरंटाईन केलं होतं. मात्र, या दहा जणांनी इथून पलायन केल्याने खळबळ उडाली होती. या दहा जणांविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान, हे दहाही जण तब्लिग जमातचे सदस्य आहेत. परंतु, त्यांचा दिल्लीतील मर्कजशी कोणताही संबंध नसल्याचं पुणे पोलीसांनी स्पष्ट केलंय.
पुणे जिल्ह्यातील शिरुरमधील मशिदीमधे होम क्वॉरंटाइन होण्यासाठी सांगण्यात आलेले दहा जण एक एप्रिलच्या रात्री पळून गेल्याचं उघड झालंय. हे दहाही जण तब्लिगचे सदस्य आहेत. परंतु, त्यांचा दिल्लीतील मर्कजशी कोणताही संबंध नसल्याचं पुणे पोलीसांनी स्पष्ट केलंय. हे दहाजण मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातील असुन 22 एप्रिलला ते पुण्यातील नाना पेठेतील मशिदीमधे राहण्यासाठी आले होते. सहा मार्चला त्यांनी त्यांचा मुक्काम नाना पेठेतील मशिदीमधुन शिरुरमधील मशिदीमधे हलवला. ते इतर कुठे जाऊ नयेत म्हणून स्थानिक प्रशासनाने एक एप्रीलला त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाइनचे शिक्के मारले आणि त्यांना शिरुरमधील मशिदीमधेच राहण्याची सुचना केली. परंतु, त्याच रात्री हे दहाजण औषधांच्या ट्रकमधुन पळाले. या ट्रकचा नंबर पोलिसांना मिळाला असुन त्यांचा शोध सुरू करण्यात आलाय. हे दहा जण कोणत्याही कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आले नव्हते. पण, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना होम क्वॉरंटाइन होण्यासाठी सांगण्यात आलं होतं, असं पोलिसांनी म्हटलय.
धक्कादायक! होम क्वॉरनटाईन व्यक्तीला शिवभोजन केंद्र चालविण्याची परवानगी
निजामुद्दीनच्या कार्यक्रमातील महाराष्ट्रातील 1400 पैकी 1300 जण क्वॉरंटाईन दिल्लीतील निजामुद्दीनच्या मर्कजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील 1400 लोक सहभागी झाले होते. यापैकी 1300 जण सापडले असून त्यांना क्वॉरंटाईन करण्याचं काम सुरु आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा केली.
नवी मुंबईतील केंद्रीय सुरक्षा बलाच्या आणखी 6 जवांनाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
मर्कज म्हणजे काय? दिल्लीतील निजामुद्दीन इथे जे मर्कज (उर्दू शब्द) आहे, त्याला तब्लिग जमातीचे संस्थान असं म्हणतात. प्रत्येक शहरात तब्लिग जमातच्या मशिदी असतात. त्या मशिदींपैकी एक मुख्य मशीद ही मर्कज असते अर्थात त्याला संस्थान म्हणतात. (उदा. पिंपरी चिंचवड शहरात एकूण 80 तब्लिक जमातीच्या मशिदी आहेत, त्यांची एका मुख्य मशिदीमध्ये सर्वांना माहिती जमा करावी लागते. कोण-कुठे-कधी आणि किती दिवस बाहेरच्या शहरात-राज्यात जमातीसाठी जातात) देशातील या सर्व मरकजची शिखर संस्था ही दिल्लीतील निजामुद्दीन येथे आहे. इथे परदेशात जमातीला गेलेल्या आणि तिथून परतलेल्या प्रत्येक मुस्लीम तब्लिगी बांधवांना माहिती द्यावी लागते. परदेशातून निजामुद्दीन मरकजमध्ये रिपोर्ट केल्यानंतर तिथून प्रत्येकाला विविध राज्यातील शहरात प्रबोधनासाठी पाठवले जाते. पण कोरोनामुळे प्रत्येकाला आपापल्या गावी पाठवण्यात आलं. मर्कजमध्ये देशव्यापी कॉन्फरन्सही होत असतात. (जमातीला जाण्याचा कार्यकाळ हा 3 दिवस ते 4 महिन्याइतका असतो, या जमातीमध्ये प्रबोधन केले जाते)
PM Modi Meeting With sport persons | पंतप्रधान मोदींचा देशातील 40 खेळाडूंशी संवाद