(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक! होम क्वॉरंटाईन व्यक्तीला शिवभोजन केंद्र चालविण्याची परवानगी
सिंधुदुर्गातील वैभववाडीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. होम क्वॉरंटाईन केलेल्या व्यक्तीला शिवभोजन केंद्र चालविण्याची परवानगी देण्यात आली होती.
सिंधुदुर्ग : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अनेकांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळावे यासाठी प्रशासनाकडून वारंवार सोशल डिस्टन्सच्या सूचना देण्यात येत आहे. असे असताना वैभववाडी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. होम क्वॉरनटाइन केलेल्या व्यक्तीला शिवभोजन केंद्र चालविण्याची परवानगी देण्यात आल्याची घटना वैभववाडी शहरात उघडकीस आली. दरम्यान ही बाब नगरसेवकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिवभोजन केंद्र सील करण्याची मागणी केली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. दुसरीकडे जे संशयित रुग्ण आहेत किंवा जे लांबचा प्रवास करुन आलेले आहेत, अशा व्यक्तींना त्यांच्या घरातचं क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून होम क्वॉरंटाईनचं उल्लघन केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता अशा व्यक्तींना रुग्णालयात क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा परिणाम; शेतकऱ्यांवर हातातोंडाशी आलेला शेतीमाल फेकून देण्याची वेळ
सिंधुदुर्गमध्ये होम क्वॉरंटाईन व्यक्ती चालवतोय शिवभोजन केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात होम क्वॉरनटाइन केलेल्या व्यक्तीला शिवभोजन केंद्र चालविण्याची परवानगी देण्यात आल्याची धक्कादायक घटना वैभववाडी शहरात उघडकीस आली. दरम्यान ही बाब नगरसेवकांच्या निदर्शनास आल्यानंतर सर्व नगरसेवक आक्रमक झाले आहेत. अशा व्यक्तींना 'शिवभोजन' थाळी चालविण्याची परवानगी कोणी दिली? असा सवाल करीत तात्काळ केंद्र सील करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. वैभववाडी तहसीलदारानी याची दखल घेत हे शिवभोजन केंद्र बंद करत या शिवभोजन केंद्रावर गेल्या दोन दिवसात 150 लोकांनी शिवभोजनाचा आस्वाद घेतलेल्या व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिलेत.
Corona Update | कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन किती तयार? भारत सरकारचा सर्व्हे
राज्यात कोरोनाचा आकडा वाढला राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आत्ताच्या घडीला राज्यात 423 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. काल गुरुवारी एकाच दिवसात 81 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार मेहनत घेत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळण्यास प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तरीही अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे.
Aurangabad Social Distancing | गर्दी टाळण्यासाठी औरंगाबादमध्ये महाराष्ट्र बँकेचा अनोखा उपक्रम