एक्स्प्लोर

Ramdas Athawale : मंत्रिमंडळ विस्तारात 'रिपाइं'ला मंत्रीपद मिळावे; रामदास आठवले यांची मागणी

मंत्रिमंडळ विस्तारात 'रिपाइं'ला मंत्रिपद मिळावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.

Ramdas Athawale : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मित्र पक्षांची मुंबईत बैठक झाली असून आगामी मंत्रिमंडळ विस्तारात 'रिपाइं'ला एक मंत्रीपद देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच जागा वाटपात विधानपरिषदेची एक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत योग्य वाटा मागितला असल्याची माहिती आठले यांनी दिली. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण रोटेशन पद्धतीने होत आहे. मात्र जिथे दलित वस्ती नाही, तिथे आमचा माणूस निवडून येत नाही. म्हणून आरक्षणाची रोटेशन बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करत आहोत, असंही रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले म्हणाले, "भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेश मध्ये झालेला हल्ला दुर्दैवी आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. या हल्ल्याचा निषेध करतो. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी."

Ramdas Athawale:  विरोधकांची एकजूट

देशातील विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकवटले आहेत. मात्र त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मोदी लोकप्रिय आणि सक्षम नेते आहेत. आगामी निवडणुकीत 350 च्या वर जागा निवडून येतील आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. जितके विरोधक एकत्र येतील, मोदींची तितकीच ताकद वाढेल, असे आठवले यांनी सांगितले.

Ramdas Athawale : सरकारची कामगिरी चांगली

वेगवेगळ्या क्षेत्रात भारताने आघाडी घेतली असून, रोजगार निर्मितीस प्राधान्य दिले जात आहे. लाखो लोकांना सरकारी नोकरीत सामावून घेतले जात आहे. खासगी उद्योगास प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यातही उद्योग वाढवले जात असून, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. विरोधकांनी प्रत्येक गोष्टीला विरोध करणे चुकीचे आहे. सरकारला सहकार्य करणे ही लोकशाही आहे.

Ramdas Athawale : मराठा आरक्षणाला विरोध नाही

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, आमच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण त्यांना द्यावे, असे आमचे म्हणणे आहे. भटक्या विमुक्त, ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्याबाबत अभ्यास सुरु आहे. त्याचा फायदा सर्व समाजाला होईल. जातीनिहाय जनगणना झाली, तर सर्वांना कोणत्या जातीचे किती प्रमाण आहे, ते समजेल. याबाबत सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे.

Ramdas Athawale : शिंदे-फडणवीस दमदार

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार चांगले चालले असून, वर्षपूर्तीच्या त्यांना शुभेच्छा देतो. या सरकारला कोणताही धोका नाही. शिंदे-फडणवीस आपला कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढील पाच वर्षे त्यांचीच सत्ता येईल. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हते. दर्शन घ्यायचेच असेल, तर चैत्यभूमीत जाऊन बाबासाहेबांचे व रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यावे असे आठवले म्हणाले.

Ramdas Athawale : गुलाबी रंग चालणार नाही

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांचा गुलाबी रंग महाराष्ट्रात चालणार नाही. नाराज नेत्यांना घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ यांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारी नाही. भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांचे आमच्या पक्षात स्वागतच आहे. पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याचे आमंत्रण देणार नाही, मात्र मिटवून घेण्याचा सल्ला देईन.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget