एक्स्प्लोर

Pune Crime News: गुन्हेगारांसोबत "वाढदिवसाचं" सेलिब्रेशन भोवलं! बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील याच्यांसह अन्य सहकाऱ्यांचे निलंबन

Pune Crime News: बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील याच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये पोलिस स्टेशनच्या दारात 'बर्थ डे' सेलिब्रेशन करणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. भर रस्त्यात रात्री बारा वाजण्याच्या ठोक्याला सांगवी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आलं होते. यावेळी चार गुन्हेगार उपस्थित होते. या गुन्हेगारांकडून पोलिसांच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील यांच्यासह अन्य सहकारी पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्यासमोर गुन्हेगांरासोबत बर्थडे सेलिब्रेशन करणं पोलीस अंमलदाराला चांगलंच भोवलं आहे.

बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील याच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे. आता बर्थडे सेलिब्रेशनचं जंगी आयोजन करणाऱ्यांवर गुन्हेगारांवर गुन्हा दाखल होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेले अंमलदार विवेक गायकवाड,सुहास डंगारे, विजय मोरे यांचे देखील तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बारा वाजण्याच्या ठोक्याला प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाण्याच्या दारातच रस्त्यावर टेबल लावण्यात आले होते. त्यावर केक ठेवून फटाके फोडण्यात आले. दोघांनी फटाक्यांची फायर गन बाहेर काढली दुसरीकडे स्काय शॉट आणि बॉम्ब फुटू लागले. ही आतिश बाजी बराच वेळ सुरू होती.एवढेच नव्हे तर या ‘सोहळ्या’साठी ड्रोनची व्यवस्था देखील करण्यात आलेली होती. त्यांच्या या कृत्याची गंभीर दखल वरिष्ठांनी घेतली आहे. शिस्तभंग झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

अगदी एखाद्या रीलस्टारला लाजवेल अशा प्रकारचं ड्रोनद्वारे बर्थडे सेलिब्रेशनचं चित्रीकरणही करण्यात आलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित झाला होता. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपाई प्रवीण पाटीलने हा प्रताप केला आहे. ज्यामुळं आख्ख्या पोलिस खात्याची मान शरमेने खाली गेली आहे. 

बुधवारचा दिवस संपताना अन् गुरुवारची सुरुवात होताना, प्रवीण पाटीलची मित्रमंडळी सांगवी पोलिस स्टेशन समोर जमू लागली. त्यात पोलिस स्टेशनमधील इतर सहकारी ही सहभागी झाले. केक, आकर्षक फटाके, ड्रोन अशी सगळी सोय करण्यात आली. मग काय बाराच्या ठोक्याला प्रवीणसह मित्र मंडळी पोलिस स्टेशन समोरील रस्त्यावर आले. रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेशन सुरु झालं.

ड्रोनने चित्रिकरण, अफलातून व्हिडीओ एडिटिंग 
दोघांनी फटाक्यांची फायर गण बाहेर काढली, दुसरीकडे स्काय शॉट आणि सुतळी बॉम्ब फुटू लागले. ही आतषबाजी बराचवेळी सुरु होती. जमाना रील्सचा आहे म्हटल्यावर याचं चित्रीकरण होणार नाही असं कसं होईल. मग हा सगळा कार्यक्रम ड्रोनद्वारे चित्रित करण्यात आला. भलेभले रीलस्टार सुद्धा लाजतील इतकं अफलातून एडिटिंग ही करण्यात आलं. मग काय दिवस उजाडताच हे व्हिडीओ प्रवीण अन् सहकाऱ्यांसह मित्र मंडळींच्या स्टेट्सवर अपलोड होऊ लागले. व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर पोलिसांवरती टीका होऊ लागली होती. अशातच त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imtiaz Jaleel Majha Vision : औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Rohit Pawar : औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imtiaz Jaleel Majha Vision : औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Rohit Pawar : औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
Delhi High Court Judge Justice Yashwant Verma : बंगल्यात आग लागताच 'नोटांचे भांडार' अग्नीशमन दलाला सापडलं! दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत तरी कोण?
बंगल्यात आग लागताच 'नोटांचे भांडार' अग्नीशमन दलाला सापडलं! दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत तरी कोण?
Nashik News : नाशिकमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू, अंगावर अनेक जखमा, अपघात की घातपात?
नाशिकमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू, अंगावर अनेक जखमा, अपघात की घातपात?
Malegaon Blast Case : मोहन भागवतांना उचलून मुंबईत आणा, परमबीर सिंह यांचा तत्कालिन एटीएस अधिकाऱ्यांना आदेश! पण, आदेश न पाळल्याने, एनआयए कोर्टात सनसनाटी दावा
मोहन भागवतांना उचलून मुंबईत आणा, परमबीर सिंह यांचा तत्कालिन एटीएस अधिकाऱ्यांना आदेश! पण, आदेश न पाळल्याने, एनआयए कोर्टात सनसनाटी दावा
''कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या''; वाघबाई म्हणत अंधारेंचा निशाणा, सगळंच काढलं
''कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या''; वाघबाई म्हणत अंधारेंचा निशाणा, सगळंच काढलं
Embed widget