(Source: Poll of Polls)
Pune Car Accident: धनिकपुत्राची ब्लड टेस्ट करणाऱ्या डॉक्टरची आणि 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करा; पुणे अपघातप्रकरणी सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल
Pune Crime News: पुणे अपघातप्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. ब्लड रिपोर्टवरुन अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. वेदांत अग्रवालची तपासणी करणाऱ्या डॉक्टरची चौकशी करण्याची मागणी
पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका पोर्शे कारने बाईकला धडक दिल्याची घटना नुकतीच घडली होती. या दुर्घटनेत बाईकवरील दोघांचा मृत्यू झाला होता. तर पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाला जमावाने चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले होते. हा अल्पवयीन तरुण पुण्यातील बडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा मुलगा आहे. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करताना प्रचंड दिरंगाई आणि चालढकल केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे पुण्यातील अपघाताचे (Pune Car Accident) हे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या सगळ्यात अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल (Vednat Agrawal) याच्या रक्ताचा अहवाल कळीचा मुद्दा ठरला होता. वेदांतने मद्यप्राशन केले होते, त्यामुळे पोलिसांनी त्याच्या रक्ताची लवकरात लवकर तपासणी का केली नाही, असा सवाल विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. डॉ. मीरा या ट्विटर अकाऊंटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
या ट्विटमध्ये पुणे अपघात प्रकरणातील पोलिसांचा तपास आणि वेदांत अग्रवाल याच्या ब्लड रिपोर्टविषयी सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. पबवाल्यांवर कारवाई करणे फारसे महत्त्वाचे नाही. त्याऐवजी वेदांत अग्रवालची तपासणी करणाऱ्या डॉक्टरची चौकशी करा. तसेच ब्लड रिपोर्टचा लिफाफा ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या हातात देण्यात आला, त्याचीही चौकशी करा. यामधून ब्लड रिपोर्टचे सत्य समोर येईल, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Alcohol Test
— डॉ. मीरा 🇮🇳( DHONI) (@DrRisingStar9) May 21, 2024
सरकारी रुग्णालयात Alcohol test साठी आरोपी आमच्याकडे आणले जातात तेव्हा पोलीस एक memo घेऊन येतात.
आरोपी minor असेल तर त्यावर विधिसंघर्षग्रस्त बालक असे लिहितात, आणि adult असेल तरच त्याचे नाव लिहितात.
त्यानंतर डॉक्टर त्याची basic clinical तपासणी करतात, vitals लिहितात.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वेदांतचा ब्लड रिपोर्ट अद्याप आला नसल्याची माहिती मंगळवारी दिली होती. त्यामुळे ब्लड रिपोर्टविषयीचे गूढ कायम आहे. या सगळ्यावरही या पोस्टमधून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. वेदांतने मद्यप्राशन केले आहे की नाही, याची चाचणी कोणत्या रुग्णालयात किंवा फॉरेन्सिक लॅबमध्ये झाली? ही चाचणी कोणत्या डॉक्टरने केली? फॉर्ममध्ये मद्यप्राशानाविषयी काय निष्कर्ष नोंदवले होते आणि काय शेरा दिला होता?, याविषयीही पोस्टमधून सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
सरकारी रुग्णालयात आरोपीची अल्कोहोल टेस्ट कशी होते?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये सरकारी रुग्णालयात मद्यप्राशन केलेल्या आरोपींच्या रक्ताची चाचणी कशी होते, याची सविस्तर प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे. सरकारी रुग्णालयात अल्कोहोल टेस्टसाठी आरोपी आमच्याकडे आणले जातात तेव्हा पोलीस एक मेमो घेऊन येतात. आरोपी अल्पवयीन असेल तर त्यावर विधिसंघर्षग्रस्त बालक असे लिहितात, आणि आरोपी सज्ञान असेल तरच त्याचे नाव फॉर्मवर लिहले जाते. त्यानंतर डॉक्टर त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करतात, व्हायटल्स लिहितात. त्यानंतर डॉक्टर एक केमिकल अॅनालिसिसचा फॉर्म भरतात. Pupils dilated आहेत का?, त्याच्या श्वासात अल्कोहोलचा वास येतोय का? तो सरळ चालतोय का? speech coherent आहे का?, हे तपासून डॉक्टर ही सर्व माहिती भरतात. त्यानंतर आरोपीचे रक्ताचे नमुने घेतात. नमुन्यांचे bulb सील करून लेबल करतात.
फॉर्मवर आरोपीचा अंगठा, आरोपीला आणणाऱ्या पोलिसाचे नाव व Batch no, तपासणी करणार्या डॉक्टरचे नाव & Reg no, प्रत्येक पानावर डॉक्टरची सही आणि हॉस्पिटलचा स्टॅम्पही असतो. नंतर हॉस्पिटल केस पेपर, केमिकल अॅनालिसिसचा फॉर्म, रक्ताचे सील व लेबल केलेले नमुने हे सर्व एका लिफ़ाफ्यात भरून तो लिफाफा लाखेने पक्का सील करतात. रक्ताचे नमुने हँडओव्हर केलेल्या पोलिसांचे नाव, बॅच नंबर आणि सही देखील फॉर्मवर आणि हॉस्पिटलच्या MLC book मधे घेतली जाते.
हा सीलबंद लिफाफा पोलीस नंतर कलिना फॉरेन्सिक लॅबला घेऊन जातात. Chemical Analysis(CA) चा report यायला किमान दोन ते तीन दिवस लागतात. आरोपीने 30ml मद्यप्राशन केले असले तरी डॉक्टरांना समजते. त्यानुसार फॉर्मवर शेरा लिहतात, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा