एक्स्प्लोर

माझा नातू अभ्यासात लक्ष देईल अन् वाईट संगतीपासून दूर राहील; आजोबांच्या गॅरंटीनंतर न्या. धनवडेंचा बिल्डरपुत्राला जामीन

Pune Car Accident: आपल्या महागड्या कारनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपी मुलाला जामीन मंजूर करण्यात आला. पण हा जामीन नेमका कोणत्या अटींच्या आधारे देण्यात आला? जाणून घेऊयात सविस्तर...

Pune Accident News : पुणे : पुण्यातील कल्याणीनगर (Pune Kalyani Nagar Accident) परिसरात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलानं आपल्या पोर्शे कारनं (Pune Car Accident News) दोघांचा बळी घेतल्याती घटना नुकतीच घडली आहे. याच हिट अँड रन प्रकरणी (Pune Hit And Run Case News) दिवसागणिक नवनवे खुलासे होत आहेत. तसेच, याप्रकरणी पुणे पोलीस आणि न्यायालयानं घेतलेल्या भूमिकेमुले केवळ पुण्यातच नाहीतर संपूर्ण देशभरात रोष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणात अपघातानंतर अवघ्या 15 तासांतच आरोपी अल्पवयीन मुलगा जामीनावर बाहेर आला. पण न्यायाधीशांनी नेमका कशाच्या आधारावर जामीन दिला? असा सवाल उपस्थित करण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी कोर्टात माझा नातू वाईट संगतीपासून दूर राहील आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीय करेल, अशी हमी दिल्यानं जामीन मंजूर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. 

आपल्या पोर्शे कारनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपी मुलाला देण्यात आलेला जामीन आणि त्याला न्यायालयाकडून सुनावण्यात आलेल्या शिक्षेचीही जोरदार चर्चा झाली. पण हा जामीन न्यायाधीशांनी नेमका कोणत्या तरतुदींच्या आधारावर मंजूर केला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

आपल्या महागड्या कारनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपी मुलाला पुणे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपी अल्पवयीन आरोपीला न्यायालयात हजर केलं गेलं. न्यायाधिश धनवडे यांच्यासमोर त्याला हजर करण्यात आलं.  यावेळी वेदातंचे वकील प्रशांत पाटील यांनी घडलेली घटना दुर्दैवी असली तरी जी कलमं लावण्यात आली आहेत, त्यामध्ये आरोपीला जामीन मिळण्याची तरतूद असल्याचं सांगितलं. न्यायालयानं ही बाब तात्काळ मान्य करुन अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला. यातील अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल अपघातावेळी दारू प्यायल्याचं प्रथमदर्शनी दिसत असूनही पोलिसांनी याबाबतचा रिपोर्ट अद्याप आला नसल्याचं कारण देत, आरोपीनं दारू प्यायल्याची बाब पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलीच नाही.

पुणे अपघातातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयानं घातलेल्या अटी. या अटी अत्यंत आश्चर्यकारक होत्या. यावरुन संपूर्ण देशभरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

अल्पवयीन आरोपीला कोणत्या अटींच्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला? 

बेदरकारपणे कार चालवून दोघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयानं घातलेल्या अटी अतिशय आश्चर्यचकारक आहेत. 

1. अल्पवयीन आरोपी पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, पळून जाणार नाही, अशी वकीलांनी हमी दिली. 
2. अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी माझ्या नातवाला वाईट संगतीपासून दूर ठेवण्याची हमी दिली आहे.  
3. आरोपी अभ्यासावर लक्ष केंद्रीय करेल, अशी हमीदेखील आरोपीच्या आजोबांनी दिलीय. 
4. अल्पवयीन आरोपीला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबलसोबत चौकात उभं राहून वाहतुकीचं नियोजन करावं लागणार आहे.
5. अल्पवयीन आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत.
6. अल्पवयीन आरोपीला भविष्यात अपघात झाल्याचं दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.

पुणे पोलिसांचे वरातीमागून घोडं 

अल्पवयीन आरोपी हा दारू प्यायल्याचं सिद्ध झाल्यास त्याला दारू देणारा बार मालक आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई करू, असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं होतं. पण पुणे पोलिसांनी वेदांत दारू प्यायल्याचं न्यायालयाच्या आधीच निदर्शनास आणून दिलं नाही. ज्यामुळे वेदांतला जामीन मिळण्यास मदत झाली आणि दोघांना आपल्या गाडीखाली चिरडूनही अल्पवयीन आरोपी अगदी सहज जामीनावर सुटला. 

अल्पवयीन आरोपीवर दाखल गुन्हात नवं कलम वाढवलं 

पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलीसांनी 185 कलम वाढवलं आहे. या मुलाला पुन्हा ज्युवीनाईल कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. दारु पिऊन कार चालवल्याबद्दल या अल्पवयीन आरोपीवर 185 कलमाच्या अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याआधी त्याच्यावर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अल्पवयीन असल्याच्या कारणावरून न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला होता.

पाहा व्हिडीओ : Pune Porsche Accident : अटक, आदेश ते जामीन! पुणे कार अपघात प्रकरणातील AtoZ माहिती!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget