एक्स्प्लोर

PCMC News : आकुर्डीमध्ये महावितरणचा आकडेबहाद्दरांना दणका; तब्बल चौदाशे वीजचोऱ्या उघड

PCMC News : चिंचवड स्टेशनजवळील आनंदनगरमध्ये महावितरणने 15 आणि 16 मार्चला धडक मोहीम राबवली. यावेळी 1400 घरगुती वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.

PCMC News : चिंचवड स्टेशनजवळील आनंदनगरमध्ये (PCMC) महावितरणने 15 आणि 16 मार्चला धडक मोहीम राबवली. यावेळी 1400 घरगुती वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. महावितरणच्या शाखा अभियंता कृतिका भोसले आणि 17 सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. या मोहिमेत थेट तारांवर टाकलेले आकडेही जप्त करण्यात आले. यानंतर नवीन घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची रीघ लागली आहे. तसेच या परिसरात वीजचोऱ्या होणार नाही यासाठी येत्या 15 दिवसांमध्ये एरियल बंच केबल लावण्यात येणार आहे.

चिंचवड शाखेअंतर्गत आनंदनगर हा परिसर येतो. या ठिकाणी 315 केव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्याची पाहणी करताना आकडे टाकून वीजचोऱ्या होत असल्याने अतिभारित झालेले रोहित्र नादुरुस्त झाल्याचे आढळून आले होते. महावितरणकडून लगेचच कारवाई करत सर्व आकडे काढून टाकण्यात आले. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी आनंदनगरमध्ये नवीन रोहित्र बसवण्यात आले ते दोन दिवसांनी पुन्हा नादुरुस्त झाले. यानंतर चिंचवड शाखेच्या सहाय्यक अभियंता कृतिका भोसले तसेच आकुर्डी उपविभाग कार्यालयाचे सहाय्यक अभियंता शितल किनकर आणि अमित पाटील यांच्यासह 15 जनमित्रांनी बुधवारी (15 मार्च) सकाळी 10 वाजता आनंदनगरमध्ये वीजचोरीविरोधी पुन्हा विशेष मोहीम सुरु केली. 

1400 घरगुती वीजचोऱ्या उघड

त्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना वीजचोरीचे परिणाम समजून सांगण्यात आले आणि अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले. गुरुवारी (16 मार्च) या मोहिमेला सकाळी 11 वाजताच्या सुमारास विरोध वाढल्यामुळे पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले. या दोन दिवसीय कारवाईमध्ये थेट आकडे टाकून तसेच इतर मार्गाने सुरु असलेल्या सुमारे 1400 घरगुती वीजचोऱ्या उघड करण्यात आल्या आणि वीजचोरीसाठी वापरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले. 

महावितरणकडून आनंदनगर परिसरातील वीजचोरीविरोधी कामगिरीबाबत मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सहाय्यक अभियंता कृतिका भोसले यांच्याशी संवाद साधला आणि सर्व सहकाऱ्यांचं कौतुक केलं. या मोहिमेला भोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश कवडे यांनीही सहकार्य केले. 

वीजचोरी टाळण्यासाठी एरियल बंच केबलचा वापर करण्याची सूचना

मुख्य अभियंता पवार यांनी आनंदनगर परिसरात पुन्हा वीजचोऱ्या होऊ नयेत, यासाठी एरियल बंच केबलचा वापर करण्याची सूचना दिली व त्याचा आराखडा त्वरित तयार करण्याचे निर्देश दिले आहे. येत्या 15 दिवसांत एरियल बंच केबल लावण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान महावितरणकडून वीजमीटर काढून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही वीजचोरी होत असल्याचे दिसून आले. तसेच काहींनी थेट आकडे टाकून वीजचोरी केल्याचे आढळून आले. या सर्वांना अधिकृत नवीन घरगुती वीज जोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन वीज जोडणी घेण्यासाठी आतापर्यंत थकबाकीपोटी सुमारे 60 हजार रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तसेच नवीन वीजजोडणीची मागणीही वाढली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींनाPM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रियाNarendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget