एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप

Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाने 1 कोटी रुपये द्यावेत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावं, असंही आंबेडकरांनी म्हटलं आहे.

परभणी: परभणीमधील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी समोर आला होता. त्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली होती. दरम्यान या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर आता परभणीतील या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना आज याबाबत माध्यमांशी सविस्तरपणे भाष्य केलं आहे. 

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, परभणीत घटना ही दुर्दैवी आहे. तिथं बांगलादेश येथे हिंदूंवर अत्याचार झाला तो मोर्चा शांततेने पार पाडला. पवार नावाच्या व्यक्तीला माथेफिरू असं जाहीर केलं. पवार हा व्यक्ती माथेफिरु नाही. तो व्यवस्थित आहे. त्याचं कुटुंब आहे, असं म्हणणं आहे. नांदेड येथील ज्या डॉक्टरांनी माथेफिरू असं घोषित केलं आहे. त्या डॉक्टरची चौकशी झाली पाहिजे. पोलिसच गाड्या फोडत होते. सरकारचं नियंत्रण नाही. सूर्यवंशी हे शहिद झाले. एलएलबी करायला आले होते. शांततेत बसले होते, वाचत बसलेले असताना त्यांना पोलिसांनी उचलून नेलं, असंही पुढे प्रकाश आंबेडकर म्हणालेत. 

शवविच्छेदन अहवालात मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाला हे सर्व काबूत आणायचं असतं तर त्यांनी आणलं असतं. संविधानाची कॉपी उघडून टाकण्यात आली. यावर सरकार नियंत्रणात आणू शकलं असतं. पण त्यांनी नियंत्रण आणलं नाही. 2004 मध्ये जी गोध्रा घटना झाली. धर्म आणि द्वेष या गोष्टी पेरण्यात आल्या आहेत. यामुळं काहीही होऊ शकतं. अशी परिस्थिती आहे. SP आणि IG यांनी कॉम्बिंग ऑपरेशन केलं नाही. ज्या व्यक्तीमुळे घटना घडली ते दुसरीकडून आले होते का?पोलिसांनी वस्तीत जाऊन लाठीचार्ज केला आहे. सव्वा महिन्याच्या मुलाच्या आईला घरात पोलिसांनी मारहाण केली आहे. हा सर्व उद्रेक आहे. यातून नवीन गोध्रा घडवण्याचं षडयंत्र आहे. लोकांनी आता सावध राहील पाहिजे. भडकवणारे अनेक येतील, असंही पुढे प्रकाश आंबेडकर म्हणालेत. 

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाने 1 कोटी रुपये द्यावेत आणि  कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावं. ज्याला घरात जाऊन मारहाण करण्यात आली. पाय तुटले आहेत. त्यांना 25 लाख रुपये द्यावेत आणि ते पैसे पोलिसांकडून वसूल करावेत. तरच अशा गोष्टींवर नियंत्रण येईल. भाजपने दंगल नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला नाही. हा वर्ग केवळ मतपेटीसाठी हवाय त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत नाहीत. गोध्रासारखं प्रकरण होऊ नये म्हणून सरकारने लवकरात लवकर जाग व्हावं. घोरबड नावाचे व्यक्ती आहेत. त्यांनी दोन जणांचा एनकाउंटर केलाय आहे. गोळ्या घातल्या आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे घोरबड आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. 

दोन मराठ्याच्या भांडणात सामान्य जनता भरडली जात आहे. सूर्यवंशी यांना लक्ष का केलं गेलं? यावर पोलिसांनी शोध घ्यावा? मराठा दलित नाही, परभणीतील रहिवाशांनी बंदला पाठिंबा दिला. घडलेल्या घटनेविषयी खंत आहे. दंगली मागील म्होरक्या कोण आहे. हे सरकार शोधू शकत. दंगलीमधील सेन्स आहे. जो लाठीचार्ज केला, त्यातील काही विधान होती त्यात द्वेष होता. आमच्या जमिनी खाल्ल्या ही मनुवाद्यांची भाषा आहे. हे सरकारने शोधलं पाहिजे. काँग्रेस पक्षाकडे 5 -6 दिवस आहेत. काँग्रेसने भूमिका घेतली नाही. तर, ते बिल मंजूर होईल. बिल आलं तर राजकीय पक्ष संपले अस समजा. तुतारी पक्षाने याबद्दल चिंता व्यक्त केली नाही, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Sara Tendulkar : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Video : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News 18 December 2024 ABP MajhaMaratha Supporters Gunratn Sadavarte :तुळजापुरात गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमकChhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषणABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 18 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Sara Tendulkar : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Video : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Uddhav Thackeray: राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, मस्ती उतरवण्याची वेळ आलेय: उद्धव ठाकरे
अमित शाहांकडून आंबेडकरांचा तुच्छतेने उल्लेख, महाराष्ट्राच्या दैवतांना संपवण्याचा प्रयत्न: उद्धव ठाकरे
Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
IPO Update : MobiKwik चा आयपीओ लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, 85 टक्के रिटर्न्स, गुंतवणूकदारांची दिवाळी
पहिल्यांदा आयपीओ थांबवला, योग्य वेळी लाँच केला, मोबिक्विचा IPO लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Embed widget