एक्स्प्लोर

Supreme Court on Adani Group : अदानी उद्योगसमूहाला मोठा दिलासा, हिंडनबर्ग प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Supreme Court on Adani Group : अदानी हिंडनबर्ग प्रकरणाबाबतची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अदानी उद्योगसमुहावर (Adani Group) आरोप करणाऱ्या हिंडनबर्ग रिपोर्टच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात SIT तपासासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.

Supreme Court on Adani Group : अदानी हिंडनबर्ग प्रकरणाबाबतची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अदानी उद्योगसमुहावर (Adani Group) आरोप करणाऱ्या हिंडनबर्ग रिपोर्टच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात SIT तपासासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. 3 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने SIT ची मागणी फेटाळून याचिका निकाली काढली होती. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court ) पुनर्विचार करावा,  यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पुनर्विचार याचिकाही फेटाळली आहे. त्यामुळे अदानी समुहाला (Adani Group) मोठा दिलासा मिळालाय. 

पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 

खंडपीठाने 5 मे रोजी दिलेल्या आदेशात म्हटलं होतं की, "पुर्नविचार याचिकेवर पाहाता असता रेकॉर्डमध्ये कोणत्याही त्रुटी दिसत नाहीत. उच्च न्यायालयाच्या नियम 2013 च्या आदेशानुसार पुर्नविचार याचिकेचे कोणतेही प्रकरण बनू शकत नाही. त्यामुळे आम्ही पुर्नविचार याचिका फेटाळत आहोत". या याचिकेवर न्यायमूर्तींनी चेंबरमध्ये विचार केला. यापूर्वी याचवर्षी 3 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने शेअरच्या किमतीत हेराफेरीच्या आरोपांबाबत सीबीआय किंवा एसआयटीला तपासाचे आदेश देण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आरोपांची 'सर्वसमावेशक तपासणी' करत आहे.

याचिकेत काय म्हणण्यात आले होते? 

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पुर्नविचार याचिकेत म्हटले होते की, निकालामध्ये त्यात 'चुका' होत्या आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलाने मिळवलेल्या काही नवीन साधनांनंतर निर्णयाचे पुनरावलोकन करण्यासाठी पुरेसे कारण होते. याचिकेत म्हटले आहे की, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने आपल्या अहवालात आरोपांनंतर केलेल्या 24 तपासांची स्थिती न्यायालयाला दिली होती. मात्र, ते पूर्ण आहे की अपूर्ण याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. 

अदानी समुहाने फेटाळले होते आरोप 

जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाविरुद्ध केलेल्या गंभीर आरोपांच्या संदर्भात न्यायालयाचा 3 जानेवारीचा निर्णय आला. हिंडेनबर्ग रिसर्चने फसवे व्यवहार आणि शेअरच्या किमतीत फेरफार असे अनेक आरोप केल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र, अदानी समूहाने हे आरोप खोटे ठरवून फेटाळले होते. आवश्यक माहिती शेअर करण्याबाबत सर्व कायदे आणि तरतुदींचे पालन केल्याचे त्यांनी सांगितले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

Balasaheb Thorat on Vishwajeet Kadam : विश्वजीत कदम फुटले असा आरोप करू नये, भास्करराव जाधव का बोलले? याचं आश्चर्य : बाळासाहेब थोरात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nasim Khan Security : माझ्यावर हल्ला करण्याचा कट, नसीम खान यांचा दावाSudhir Mungantiwar : मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं अमित शाहांनी कधीच म्हटलेलं नाहीMaharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा एका क्लिकवर एबीपी माझाSachin Dodke on Vidhan Sabha : मतदान संपलं, सचिन दोडके म्हणतात आता भात काढणी करायची इच्छा आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget