एक्स्प्लोर

Sunetra Pawar Sharad Pawar : सुनेत्रा पवार मोदीबागेत, पुण्यात भेटीगाठी, नणंदेच्या भेटीला गेल्याची दादा गटाची माहिती!

Sunetra Pawar Sharad Pawar : राज्यसभा खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदा पुण्यातील मोदीबागेत दाखल झाल्या होत्या.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. या भेटीच्या चर्चा सुरु असतानाच राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज पुण्यात मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. शरद पवार काल मुंबईहून पुण्याला रवाना झाले होते. आज सकाळी सुनेत्रा पवार मोदी बागेत दाखल झाल्या होत्या. मोदी बागेत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. 

सुनेत्रा पवार यांनी कुणाची भेट घेतली? 

सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांची खासदारपदी बिनविरोध निवड झाली होती. या सर्व घटनाक्रमानंतर सुनेत्रा पवार आज खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यातील शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. या भेटीत त्यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये दाखल झाल्या तेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होते.  शरद पवार, सुप्रिया सुळे मोदी बागेतील निवासस्थानी असताना सुनेत्रा पवार देखील मोदी बागेमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यामुळं सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत कोणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.⁠ सुनेत्रा पवार शरद पवार सुप्रिया सुळे यांना भेटल्या का⁠ याबात उत्सुकता देखील निर्माण झालेली आहे.

सुनेत्रा पवार साधारणपणे एक तास मोदीबागेत होत्या. एका तासानंतर सुनेत्रा पवार मोदी बागेमधून बाहेर पडल्या आहेत.

दरम्यान, सुनेत्रा पवार मोदी बागेत गेल्या, मात्र त्या शरद पवारांच्या भेटीला गेल्याची चर्चा होती. पण त्या अजित पवारांची बहीण नीता पाटील यांच्या भेटीला गेल्याचं स्पष्टीकरण अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी दिली.  

छगन भुजबळांकडून काल शरद पवारांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बारामतीत झालेल्या जनसन्मान रॅलीमध्ये शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर छगन भुजबळ दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. मुंबईत छगन भुजबळ यांनी सिल्वर ओक इथं शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत मराठा ओबीसी आरक्षणावरुन निर्माण झालेला वाद शांत करण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न करावेत यासाठी चर्चा केल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं.  

संबंधित बातम्या :

NCP Sharad Pawar Demand: विदर्भात वाढीव जागा हव्यात, थोरल्या पवारांची मागणी; पवारांच्या पक्षाचा हट्ट काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget