एक्स्प्लोर

गोपीनाथ मुंडेंच्या बालेकिल्ल्यात गडकरी म्हणाले, पंकजाकडे कर्तृत्व आणि नेतृत्व, जात-पात बघून मतदान करु नका!

पंकजा मला मुलीसारखी आहे. पंकजामध्ये कर्तृत्व आहे, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून ती मोठी नाही तर तिच्यात काम करण्याची धमक आहे.

बीड : मराठवाड्यातील हायव्होल्टेज लढत असलेल्या बीड मतदारसंघातील (Beed) प्रचाराच्या तोफा पुढील काही तासांतच संपणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 7 मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघातील अंबेजोगाई येथे जाहीर सभा घेऊन पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) निवडून देण्याचं आवाहन केलं. बीडमधील सभेत नरेंद्र मोदींनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंची आठवण जागवली. त्यानंतर, आज पंकजा यांच्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बीडमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी, त्यांनीही गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवत पंकजा मला लेकीसारखी असल्याचं म्हटलं. गडकरींच्या या वाक्यावर उपस्थितांनी जल्लोष करुन दाद दिली. विकसित भारत, विकासकामे, काँग्रेसचा कार्यकाळ, मोदींचा कार्यकाळ यासह जातीय कारणावरही गडकरींनी बीडमध्ये भाष्य केलं.

नितीन गडकरींनी पंकजा मुंडेंच्या बालेकिल्ल्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची आठवण काढली. पंकजा मला मुलीसारखी आहे. पंकजामध्ये कर्तृत्व आहे, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून ती मोठी नाही तर तिच्यात काम करण्याची धमक आहे. तिच्यामध्ये वक्तृत्व आहे, कर्तृत्व हे, नेतृत्व आहे. आता तुम्हाला तुमच्यासाठी संघर्ष करणारी, वेळ पडल्यास स्वपक्षातही संघर्ष करणारी पंकजा आहे. पंकजा खासदार झाल्यास महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान देऊ शकते. या जिल्ह्याचा, मतदारसंघाचा विकास करायचा असल्यास कमळाचं बटण दाबून पंकजाला निवडून द्या, असे आवाहन नितीन गडकरी यांनी बीडमधून केलं.  

सोनवणेंवर साधला निशाणा

छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे प्रेरणास्थान आहेत. समतेचा संदेश देणारे महात्मा फुले आमचे आदर्श आहेत. मी तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे, तिसऱ्यांदा निवडून येणार आहे. 101 टक्के निवडून येणार, लाखोंच्या मतांनी निवडून येणार, असे म्हणत नितीन गडकरींनी नागपूरमधील विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच, मी माझ्या लोकांना सांगितलं आहे, नागपूर माझा परिवार आहे, मी नागपूरचा आहे, जनता माझा परिवार आहे. हे सांगायची हिंमत आहे माझ्यात, जो करेगा जात की बात, उसको पडेगी कस के लाथ... असे म्हणत नितीन गडकरी यांनी नाव न घेता बजरंग सोनवणेंवर निशाणा साधला. जात-पात-धर्म-पंथ-भाषा याचा विचार केला नाही पाहिजे, तुम्हाला ह्रदयावर शस्त्रक्रिया करायची असल्यास माझ्या जातवाल्याकडे करु असा विचार करता का, काही खायचं असेल तेव्हा विचार करता का, असा प्रश्न विचारत विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वाला, पंकजाला निवडून द्या, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. बीडच्य बायपाससह, रिंग रोड, स्लीप रोड, उड्डाणपुलाचेही काम निश्चितपणे करुन देईल. पण, पंकजाला निवडून द्या तरच माझ्याकडे या, नाहीतर येऊ नका, असा मिश्कील टोलाही गडकरींनी लगावला. कारण, मी जे बोलतो ते करतो, जे करतो तेच बोलतो, असेही गडकरींनी म्हटलं. 

गडकरींच्या बीडमधील भाषणातील मुद्दे

आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर काँग्रेसला 60 वर्ष राज्य करता आले.

काँग्रेस ने गरिबी हटाव चा नारा दिला पण गरिबी हटला नाही..

60 वर्षात जे काँग्रेस करू शकली नाही केवळ 10 वर्षाच्या काळात मोदींजीच्या नेतृत्वात आम्ही करून दाखवले .

10 हजार कोटी रुपयांचे रस्ते झाले.

आपल्या महाराष्ट्राचे दैवत विठोबा आहे.

मला सगळ्यात मोठा आनंद कोणता आसेल तर देहू आणि आळंदीपासूनचे पालखी मार्ग 1200 कोटी रुपये खर्च करून पूर्ण झाला आहेत

मी कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून कधी भडवेगिरी केली नाही.

जो जो कॉन्ट्रॅक्टर खराब काम करेल त्याला रगडल्याशिवाय राहणार नाही

जी कामे केली ते केवळ ट्रेलर होते, आता पिक्चर बाकी आहे..

मला आज मुंडे साहेबाची आठवण येत आहे..

ते लोकनेते होते..मला त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली

आज राज्यात भाजप पार्टी वाढली त्यात सगळ्यात जास्त वाटा हा मुंडे आणि महाजनांचा आहे

पंकजा मला मुलगी सारखी आहे..

तुम्ही भाजपला मत दिले नसते तर मोदीजी पंतप्रधान झाले नसते, तर मी मंत्री झालो नसतो

गावात रस्ते नव्हते.. दवाखाना आणि शाळा नव्हत्या म्हणून लोक शहारा कडे येत आहेत

आम्हाला गावं समृद्ध आणि संपन्न करायचे आहेत..

शेतकऱ्यांच्या मालाला किंमत द्यायची आहे..

आज मी हेलिकॉप्टर मधून बघत होतो..

मी सांगितले होते, ज्यांनी मागच्या जन्मात पाप केले असेल त्यांनीच या जन्मी वृत्तपत्र आणि साखर कारखाने काढले

अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान होते..

मी एका शिष्ठ मंडळसोबत ब्राझील ला गेलो आणि उसापासून इथेनॉल बनवण्याची प्रक्रिया आणली

100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या एनोव्हामध्ये ही फिरतो

इंडीयन ऑईल कडून 300 पेट्रोल पंप काढण्याची तयारी सुरू केली

इथेनॉलचा रेट 60 रुपये आणि पेट्रोल चे रेट 100 रुपये लिटर आहे

उसाची किंमत वाढणार आहे. पाण्य पासून आपण हायड्रोजन तयार करत आहोत..

मिराई नावाची माझ्याकडे बाईक आहे,  ती हायड्रोजन वर चालते

आपण गरीब का राहिलो, कारण काँग्रेसची चुकीचे धोरणे होती म्हणून आपण गरीब होतो

कामावरून निवडणूक लढता येत नाही म्हणून ज्यावेळी काँनविंस होत नाही. त्यावेळी कन्फ्युज करण्याचा आमच्या विरोधकांचा डाव आहे.

मुसलमानांना सांगण्यात येत आहे की, तुम्ही सुरक्षित रहा नाहीत, हे तुम्हाला पाकिस्तानला पाठवतील, असं चुकीचे सांगत आहेत

माझ्या ऑफिसमध्ये आणि घरी माझ्या आई वडिलांचा फोटो नाही तर शिवाजी महाराजांचा फोटो आहे

जो करेगा जात की बात उसको पडेगी कसके लाथ

पंकजा मध्ये कर्तुत्व आहे. केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून ती मोठी नाही तर तिच्यात काम करण्याची धमक आहे

वेळ पडली तर स्व पक्षात सु्द्धा संघर्ष करण्याची ताकत पंकजामध्ये आहे.

डबल इंजिन सरकार आणि तिसऱ्या बाजूला माझ्या रोडची बुलेट ट्रेन सुसाट पुढे घेवून जाईल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Jaykumar Gore: कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News 23 March 2025ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsSushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण समोर, सीबीआयच्य अंतिम अहवालात काय?100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha 23 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Jaykumar Gore: कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
Suryakumar Yadav :  ऋतुराज गायकवाड येताना दिसला , सूर्यकुमार यादवनं 'ती' गोष्ट लपवली अन् नंतर मिठी मारली, मुंबई इंडियन्सकडून Video शेअर
ऋतुराज गायकवाड येताना दिसला , सूर्यकुमार यादवनं 'ती' गोष्ट लपवली अन् नंतर मिठी मारली, मुंबई इंडियन्सकडून व्हिडिओ शेअर
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Embed widget