Mulund: मुलुंड राडा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना भोवला; 25-30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, पाच जणांना अटक
सरकारी कामात अडथळा आणल्याची गंभीर कलमासह 25-30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई : मुलुंडमध्ये भाजपच्या (Mulund BJP Dispute) वॉर रूममध्ये पैसे ठेवल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा केला आहे. मुलुंडचा राडा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना भोवला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 25-30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाच जणांना अटक केली आहे.
मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या कार्यालयात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांचा जोरदार राडा झाला. कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसेवाटप सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केला. आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की झाली. सरकारी कामात अडथळा आणल्याची गंभीर कलमासह 25-30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
दोन लाख रुपये रक्कम जप्त
गुरुजोतसिंह , अभिजित चव्हाण, रोहित चिकने, दिनेश जाधव, अनंत पवार अशी अटक कार्यकर्त्यांची नावे आहे. काल दोन लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे. कलम 353,332,341,143,147,149 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकार?
मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांचा जोरदार राडा झाला. कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसेवाटप सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केला. आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याचवेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले. त्यावरून दोन्ही कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की झाली. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कोटेचा यांच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही घटनेचा आढावा घेतला.
मुलुंडमध्ये कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही: उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेेद्र फडणवीसलांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईतील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. तर मुलुंडमध्ये कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना आपलं सरकार आल्यानंतर सोडणार नसल्याचा इशारा ठाकरेंनी दिलाय.
आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते, या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहे. जे काम निवडणूक आयोगा तिथे काम करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी मुलुंड आंंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.
Video :
हे ही वाचा :