Jayant Patil : मतदान होईपर्यंत पैसे येत राहणार, पैसे परत घेऊ, छाननी करु बोलणे म्हणजे महिलांना भीती दाखवण्याचा प्रकार : जयंत पाटील
Jayant Patil, अहमदपूर : "लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत. योजना जाहीर केलीये म्हटल्यानंतर थोडे थोडे पैसे यायला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या मतदानापर्यंत येत राहणार आहेत. त्यामध्ये फार आश्चर्य नाही. भाजपचे आमदार जे वक्तव्य करतात."

Jayant Patil, अहमदपूर : "लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत. योजना जाहीर केलीये म्हटल्यानंतर थोडे थोडे पैसे यायला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या मतदानापर्यंत येत राहणार आहेत. त्यामध्ये फार आश्चर्य नाही. भाजपचे आमदार जे वक्तव्य करतात. ते खोलीत कुठेतरी बसूनच करत असतील. कारण ते अधिकृतपणाने पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे जे त्यांना बोलता येत नाही, ते आमदारांच्या माध्यमातून बोलले जात आहे. महिलांना भीती दाखवण्याचा हा प्रकार आहे. हे जनतेचे पैसे आहेत", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले. ते अहमदपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील भगिनींसाठी आनंदाचा क्षण - आमदार प्रसाद लाड
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनापूर्वीच राज्यातील माता-भगिनींच्या खात्यामध्ये ३००० रुपये वर्ग होत असून, राज्य सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला आहे. याकरिता राज्य सरकार, महिला व बालविकास विभाग, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार! आणि माता-भगिनींना शुभेच्छा देत असल्याचे आमदार प्रसाद लाड म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाल्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने पालकमंत्री दादा भुसे यांचा रात्री दहा वाजता सत्कार करण्यात आला. यावेळी रक्कम जमा झालेल्या बहिणींचाही सत्कार करण्यात आला. या बहिणींकडून पालकमंत्री दादा भुसे यांना राखी बांधण्यात आली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून लाभार्थी महिलांनी सरकारचे आभार मानले आहे. सरकारकडून रक्षाबंधनाच्या दिवशी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार असेल सांगण्यात आले होते. मात्र दोन दिवस आधीच महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमधील देखील माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आपल्या बँक खात्यात 3 हजार पैसे जमा झाले, असे मेसेज आले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. राज्यात आतापर्यत 1 कोटी 64 लाख 40 हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील जवळपास 1 कोटी 36 लाख पात्र महिला आहेत. अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पात्र महिलेच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sambhajiraje Chhatrapati : सर्वांना स्वातंत्र्य असतं, मी वडिलांच्या विरोधात नाही; पण माझी भूमिका वेगळी; काँग्रेसमध्ये मी फिट होत नाही : संभाजीराजे छत्रपती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
