Devendra Fadnavis in Beed: देवाभाऊ आज बीडच्या दौऱ्यावर, पण धनंजय मुंडे गैरहजर राहणार, समोर आलं महत्त्वाचं कारण
एकीकडे मस्साजोग प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांमध्ये अंजली दमानिया यांनी मंगळवारी धनंजय मुंडे यांच्यावर कृषिमंत्री असताना घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केलेत

Devendra Fadnavis in Beed: बीडमध्ये राजकीय घडामोडींनी सध्या वेग आलाय. एकीकडे मस्साजोग प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांमध्ये अंजली दमानिया यांनी मंगळवारी ( 4 फ्रेब्रुवारी ) अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर कृषिमंत्री असताना घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केल्याने भर पडली आहे. राज्यातील राजकारणाला वेग आलाय .आधीच वाल्मीक कराडशी असलेल्या आर्थिक संबंधांच्या आरोपामुळे पाय रुतलेला असताना आता विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढू लागलेली आहे. दरम्यान, आज ( 5 फेब्रुवारी ) बीडच्या आष्टीत काही विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित सरकारी कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थिती राहणार का? असा प्रश्न असताना ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना सरकारी कार्यक्रमाचे निमंत्रण आहे. मात्र ते या कार्यक्रमाला गैरहजर राहणार आहेत.
गैरहजेरीचे कारण काय?
आष्टी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्याउद्घाटनाच्या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत.. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित राहतील का असा प्रश्न होता मात्र.. धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन आज असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत.. मात्र पंकजा मुंडे या सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच सुरेश धस यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळू शकतात. उद्या त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन आहे. मोतीबिंदूचं ऑपरेशन होईल त्यानंतर 8 दिवस घरीच असतील. सध्या धनंजय मुंडे सातपुडा या सरकारी निवासस्थानी आहे.
अंजली दमानिया, धनंजय मुंडे आरोप-प्रत्यारोप
महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना त्यांच्या विभागात तब्बल 88 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे आहेत. आम्ही शांत बसलो आहोत, असे कोणीही समजू नये. आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकचे काहीच नाही, असा समज कोणीही करुन घेऊ नये, असा इशारा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. आता राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीची खरेदी करताना अंजली दमानिया यांना विचारुन दर ठरवायचा का? त्या बोलतील तोच दर उचित, अन्यथा उचित नाही. त्यांना विचारुन दर दिला तर ते योग्य, नाहीतर भ्रष्टाचार म्हणायचा का, असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्या आडनावाचा उल्लेख 'बदनामिया' असा करत त्यांची खिल्ली उडवली.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
