एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : विरोधकांना अंगावर घेणे ते महायुतीतील स्थानिक राजकारण,छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्याची 3 मोठी कारणे

Chhagan Bhujbal, Nashik : छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Ajit Pawar) कार्यालयासमोरच निदर्शने करण्यात येत आहेत.

Chhagan Bhujbal, Nashik :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भुजबळांसह त्यांच्या समर्थकांना जबर धक्का बसला आहे. राज्याच्या राजकारणातील बडे नेते  असणारे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज झाले असून हिवाळी अधिवेशनाला सुरवात होताच त्यांनी नाशिकचा रस्ता धरला आहे. कुठे टायर ची जाळपोळ, कुठे रास्तारोको तर कुठे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Ajit Pawar) कार्यालयासमोरच निदर्शने करण्यात येत आहेत.

नाशिक आणि येवला तालुक्यात याला सुरुवात झालीये..त्याला कारण ठरलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणातील ओबीसी चेहरा असणाऱ्या छगन भुजबळ यांना मंत्री मंडळात मिळालेला डच्चू..  शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता अजित पवारांच्या पक्षात असणारे छगन भुजबळ नेहमीच राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत, परीणामांची तमा न बाळगता कोणालाही अंगावर घेण्याची त्यांची बेधडक, आक्रमक शैली नेहमीच चर्चेत राहिली आहे. मंडल आयोगाच्या मुद्यावर शिवसेनेला जय महाराष्ट्र करणे, बाळासाहेब ठाकरे यांचावर टीका करणे असो,  शरद पवारांची साथ देत काँग्रेसला सोडचिठ्ठी देणे असो, अजित पवारांच्या बंडाला बळ देत शरद पवारांची साथ सोडणे असो,  किंवा मराठा आरक्षणाचा।मुद्यावर मराठा आंदोलक  मनोज जरांगे पाटील यांना थेट अंगावर घेत ओबीसींचा आवाज तेवढ्याच तीव्रतेने मांडणे असो. प्रत्येक वेळी छगन भुजबळ चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले.. छगन भुजबळ यांची हीच भूमिका त्यांच्या वाटेतील अडसर ठरली आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना विरोध करत भुजबळ यांनी स्वतःच्या उमेदवारीचा दावा केला. भुजबळ यांनी निवडणुकीतुन माघार घेतली मात्र त्यांच्या भूमिकेविषयी पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांनी अनेकवेळा संशय व्यक्त केला होता. विधानसभा निवडणुकीत ही छगन भुजबळ यांचे उपद्रव मूल्य दिसून आले, नांदगांवचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यां विरोधात पुतण्या समीर भुजबळ यांना उतरवून भुजबळ यांनी युतीत मिठाचा खडा टाकला. त्यामुळे नांदगावची निवडणूक चांगलीच चर्चेत आली. प्रशासनावर पकड आणि पक्षात दबदबा असणाऱ्या त्याच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान नसल्यानं कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत, ठीक ठिकाणी आंदोलन करत असून पक्ष नेतृत्वालाच एक प्रकारे आव्हान देत आहेत.

छगन भुजबळ यांचा राजकिय प्रवास ही  चित्रपटातील भूमिकेला साजेसा चढउतारचा राहिला आहे. भुजबळ एकीकडे राजकारणाची वेगवेगळ्या शिखरं पादाक्रांत करत असतानाच तेलगी घोटाळा प्रकरणात भुजबळ यांचे नाव जोडले गेले.  महाराष्ट्र सदन घोटाळा, मनी लोंद्रीगचे आरोप झाले, ईडी च्या चौकशी नंतर तुरुंगवास भोगला. मात्र यातूनही भुजबळ बाहेर पडले, पुन्हा लढले आणि थेट मंत्रीपद पटकावले.मुबंईचे महापौर शिवसेनेचे पहिले आमदार, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री असे एक ना अनेक पद उपभोगणारे भुजबळ 1991 पासून जेव्हा जेव्हा सत्तेत आले. तेव्हा तेव्हा मंत्रिमंडळात मानाच्या स्थानावर राहिले, अजित पवार यांच्या पक्षातही वयाने आणि मानाने भुजबळ कायमच पहिल्या रांगेत राहिले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान नाही हे स्वतः भुजबळ यांच्याही पचनी पडलेलं नाही, त्यामुळेच मंत्रिपद का नाही हे तुम्ही अजित पवारांचा विचारा असा रोख भुजबळ यांचा दिसतोय

आजवर जेव्हा जेव्हा भुजबळ अडचणीत आलेत किंवा मोठी लढाई लढण्याची त्यांनी तयारी केली तेव्हा तेव्हा समता परिषद आणि भुजबळ समर्थक मैदानात उतरले आहेत. विधिमंडळ अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, एकीकडे अधिवेशन सुरू झाले आणि दुसरीकडे भुजबळ यांनी नाशिकचा रस्ता पकडला आहे. नागपूरहून भुजबळ थेट आपल्या येवला मतदार संघात जाणार आहेत तिथुन नाशिक ला पोहचतील या दरम्यानच्या काळात कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आपली आपल्या भुजातील "बळ"राष्ट्रवादी काँग्रेसचे "दादा" असणाऱ्या अजित पवारांना दाखविणार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा बंडाच्या भूमिकेत असणाऱ्या छगन भुजबळ यांची समजूत अजित पवार काशी काढणार त्यांचे पुनर्वसन कसे करणार आणि मंत्रिपद नाकारण्याचे काय कारण सांगणार याकडे लक्ष लागले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale on Dhananjay Munde : वाल्मिक कराड धनजंय मुंडेंच्या जवळचा, राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री आठवलेंचं करुणा शर्मांच्या पोस्टवरही भाष्य
वाल्मिक कराड धनजंय मुंडेंच्या जवळचा, राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री आठवलेंचं करुणा शर्मांच्या पोस्टवरही भाष्य
धावत्या ट्रकचा भीषण अपघात; वाहनाचं तोंड वरती, डंपर पलटी, सुदैवाने दुर्घटना टळली
धावत्या ट्रकचा भीषण अपघात; वाहनाचं तोंड वरती, डंपर पलटी, सुदैवाने दुर्घटना टळली
Virat Kohli and Rohit Sharma : कोहली आज मैदानात उतरताच 'विराट' इतिहास रचणार! कॅप्टन रोहित सुद्धा स्पेशल रेकॉर्ड करणार
कोहली आज मैदानात उतरताच 'विराट' इतिहास रचणार! कॅप्टन रोहित सुद्धा स्पेशल रेकॉर्ड करणार
Mumbai Crime: पोटात लपवून आणले तब्बल 11 कोटींचे कोकेन, ब्राझीलवरून आलेले विदेशी महिलेला 100 कॅप्सूलसह मुंबई विमानतळावर अटक
पोटात लपवून आणले तब्बल 11 कोटींचे कोकेन, ब्राझीलवरून आलेले विदेशी महिलेला 100 कॅप्सूलसह अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : 02 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 March 2025 : ABP Majha : Maharashtra News :City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान : 02 March 2025 : ABP MajhaRaksha Khadse : एका मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य जनतेच्या मुली बाळींचे काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Athawale on Dhananjay Munde : वाल्मिक कराड धनजंय मुंडेंच्या जवळचा, राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री आठवलेंचं करुणा शर्मांच्या पोस्टवरही भाष्य
वाल्मिक कराड धनजंय मुंडेंच्या जवळचा, राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री आठवलेंचं करुणा शर्मांच्या पोस्टवरही भाष्य
धावत्या ट्रकचा भीषण अपघात; वाहनाचं तोंड वरती, डंपर पलटी, सुदैवाने दुर्घटना टळली
धावत्या ट्रकचा भीषण अपघात; वाहनाचं तोंड वरती, डंपर पलटी, सुदैवाने दुर्घटना टळली
Virat Kohli and Rohit Sharma : कोहली आज मैदानात उतरताच 'विराट' इतिहास रचणार! कॅप्टन रोहित सुद्धा स्पेशल रेकॉर्ड करणार
कोहली आज मैदानात उतरताच 'विराट' इतिहास रचणार! कॅप्टन रोहित सुद्धा स्पेशल रेकॉर्ड करणार
Mumbai Crime: पोटात लपवून आणले तब्बल 11 कोटींचे कोकेन, ब्राझीलवरून आलेले विदेशी महिलेला 100 कॅप्सूलसह मुंबई विमानतळावर अटक
पोटात लपवून आणले तब्बल 11 कोटींचे कोकेन, ब्राझीलवरून आलेले विदेशी महिलेला 100 कॅप्सूलसह अटक
Rohini Khadse : महिला सुरक्षेसाठी गृहखातं अपयशी, पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली? भाचीच्या छेडछाडीवरून रोहिणी खडसे संतापल्या
महिला सुरक्षेसाठी गृहखातं अपयशी, पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली? भाचीच्या छेडछाडीवरून रोहिणी खडसे संतापल्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलीशान रिसॉर्टवरून तीन विमानांचे उड्डाण, हवाई दलाची पळापळ, फायटर जेट पाठवण्याची वेळ आली
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलीशान रिसॉर्टवरून तीन विमानांचे उड्डाण, हवाई दलाची पळापळ, फायटर जेट पाठवण्याची वेळ आली
Eknath Khadse : नातीची टवाळखोरांकडून छेडछाड, आजोबा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप; म्हणाले, गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे...
नातीची टवाळखोरांकडून छेडछाड, आजोबा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप; म्हणाले, गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे...
भारत, इंग्लंड, फ्रान्स ते झेलेन्स्की! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 38 दिवसांत पाच राष्ट्रप्रमुखांना जाहीरपणे धमक्या, वादविवाद आणि फटकार; नेमकं यातून साध्य काय होणार?
भारत, इंग्लंड, फ्रान्स ते झेलेन्स्की! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 38 दिवसांत पाच राष्ट्रप्रमुखांना जाहीरपणे धमक्या, वादविवाद आणि फटकार; नेमकं यातून साध्य काय होणार?
Embed widget