लाडकी बहीण म्हणून विधानपरिषदेवर घ्या, फडणवीसांच्या उमेदवारी अर्जावर सही करणाऱ्या कार्यकर्तीची इच्छा
लाडक्या बहिणींमुळे भाजपला मोठा विजय मिळाल्यानंतर भाजपच्या नेत्या आणि देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज भरताना प्रस्तावक राहिलेल्या निलीमा बावणे यांनी पक्षाकडे विधानपरिषदेची मागणी केली आहे.
Maharashtra Politics नागपूर : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतील अभूतपूर्व यश मिळाले आहे. महायुतीच्या या यशात सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा चांगलाच बोलबाला राहिल्याचेही बघायला मिळाले. परिणामी महिलांचा मतदानाचा टक्का देखील लक्षणीय वाढला आहे. दरम्यान, लाडक्या बहिणींमुळे भाजपला मोठा विजय मिळाल्यानंतर आता पक्षाच्या महिला नेत्यांनी विधानपरिषदेवर दावा केला आहे. विधानसभा निवडणूकीत महिलांच्या वाढलेल्या मतदानामुळे भाजपच्या नेत्या निलीमा बावणे यांनी पक्षाकडे विधानपरिषद मागीतली आहे. निलीमा बावणे या देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज भरताना प्रस्तावक होत्या. त्यामुळे 'विधानसभेत तिकीट मिळाली नाही, मात्र आता पक्षाकडे विधानपरिषद मागणार' असा आग्रह त्यांनी यावेळी धरला आहे. त्यामुळे राज्याचे लाडके देवा भाऊ अशी ओळख असलेले आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यावर काय पवित्रा घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महिलांचे प्रतिनिधी म्हणून मला संधी द्यावी-निलीमा बावणे
दरम्यान, यावेळी बोलताना भाजपच्या नेत्या निलीमा बावणे म्हणाल्या की, गेले अनेक वर्षे भाजप आणि सामाजिक जीवनात मी काम करत असलेल्याने माझी दावेदारी प्रबळ आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मी विधानपरिषद मागणार आहे, असे त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज भरताना प्रस्तावक म्हणून मी सही केली, त्याचा मला फार अभिमान आहे. 50 टक्के महिलांना आरक्षण आहे. त्यामुळे महिलांचे प्रतिनिधी म्हणून मला संधी द्यावी, महिलांचा विचार व्हावा, त्यातून महिलांचा उद्धार करण्याचा माझा मानस आहे. भाजपच्या माजी नगरसेविका म्हणून मी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे पुढेही अधिक काम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे विधानपरिषदेबाबत मागणी करणार असल्याचे निलीमा बावणे म्हणाल्या.
राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर दृष्टीपथात आला आहे. शनिवारी मुंबईतील राजभवनात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडेल. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार, याची माहिती समोर आली आहे. 'एबीपी माझा'च्या हाती लागलेल्या यादीनुसार, शिवसेनेला एकूण 9 मंत्रीपदं आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. ही यादी जवळपास निश्चित मानली जात आहे. यामध्ये नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी योग्य संतुलन राखले आहे.
दरम्यान, शिवसेना मंत्र्यांच्या संभाव्या यादीवर नजर टाकल्यास भाजपचा विरोध असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्याचे दिसत आहे. भाजपने दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला विरोध केला होता. त्यामुळे या अनुभवी नेत्यांना एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्याचे दिसत आहे.
शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री
एकनाथ शिंदे
उदय सामंत
शंभुराज देसाई
दादा भुसे
प्रताप सरनाईक
संजय शिरसाट
गुलाबराव पाटील
भरत गोगावले
शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री
योगेश कदम
विजय शिवतारे
राजेंद्र यड्रावकर किंवा प्रकाश आबिटकर
इतर महत्वाच्या बातम्या: