बीडच्या ‘जायंट किलर’ बजरंग बप्पांचा अजित पवारांना फोन; मिटकरींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अमोल मिटकरी ट्विटच्या माध्यमातून बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचं नमूद केले आहे. अमोल मिटकरींच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे.
बीड : बीडमध्ये (Beed News) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पराभूत करणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ‘जायंट किलर’ खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी ट्विटच्या माध्यमातून बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचं नमूद केले आहे. अमोल मिटकरींच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, एक तर सकाळी गळाला लागल्यासारखा दिसतोय, बोलतोय लवकर मोठा पिक्चर तुम्हाला दिसेल. अजित पवार हे राज्याच्या केंद्रस्थानी महत्त्वाची व्यक्ती आहे, हे सिद्ध होत आहे. एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुराचा प्रश्न असेल आणि तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल आणि तो दादांना विनंती करत असेल तर माझ्या सारख्या राष्ट्रवादीच्या आमदाराला ही भूषणावाह बाब आहे.
आज तुम्ही ट्रेलर पाहिला आता विरोधकाकडून स्पष्टीकरण साहजीक आहे. आता आम्ही पण वाट पाहतो की, ते काय स्पष्टीकरण देतात. आमचे चुकीचे असेल संबंधित नेत्यांते कॉल डिटेल्स काढा तुम्हाला कळेल. दुपारी देखील फोन येऊन गेल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी तुम्ही बघा आगे, आगे देखो होता है क्या? असेही मिटकरी म्हणाले.
बीडच्या बप्पाचा दादांना फोन #मोठ्यामनाचादादा
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 11, 2024
अजित पवारांना फोन केला का? बजरंग सोनावणे म्हणाले...
बजरंग सोनावणे म्हणाले, अमोल मिटकरींनी लोकसभेत एखादा खासदार निवडून आणायला पाहिजे होता त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांविषयी बोलावे.मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांसोबत राहणार आहे. अमोल मिटकरी यांनी गोंधळ निर्माण करण्याचे प्रकार अमोल मिटकरींनी बंद करावे. अगोदर एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य निवडून आणावा नंतर दुसऱ्यांचे बोलावे. मी फोन करण्याचा संबंधच कुठे येतो? राजकारणाच्या प्रक्रियेत काही वैयक्तिक विषय असतात. वैयक्तिक विषयाला राजकारणात आणतात. मिटकरींनी दिशाभूल करण्याचा प्रकार बंद करावा.
Video :
हे ही वाचा :
Bajrang Sonawane: लोक माझी लायकी विचारत होते, बीडच्या जनतेने माझी लायकी दाखवून दिली, शरद पवारांसमोर बजरंग सोनवणेंचं धगधगतं भाषण